अकोला जिल्ह्यातील खडकी येथील अंगणवाडी केंद्राला वाल कंपाऊंड साठी शासनाकडून निधी उपलब्ध नाही गर्भवती महिलांसह लहान मुले व अंगणवाडी सेविका असुरक्षित

अकोला महाराष्ट्र

सबला उत्कर्ष प्रतिनिधी ऋषभ काळे..


खडकी “बु ” येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 2 ला गांजर गवताने घेरले असून मोठ्या प्रमाणात गांजर गवत या ठिकाणी वाढल्यामुळे गर्भवती महिला सह लहान मुले व अंगणवाडी सेविका यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या अंगणवाडी केंद्रात गावातील गर्भवती महिला व लहान मुलांना पोषण आहाराचा लाभ व अंगणवाडी केंद्राकडून देण्यात येणारे लाभ घेण्यासाठी येणे जाणे करावे लागते.परंतु या गंभीर प्रकाराकडे स्थानिक महानगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक यांच्याकडे तक्रार करूनही या ठिकाणचे गांजर गवत काढण्यात आले नाही.त्यामुळे स्थानिक आरोग्य निरीक्षक हे केवळ नावापुरते उरले असून आपले कर्तव्य बजावण्यासाठी टाळाटाळ करतांना आढळून येतात.अंगणवाडी केंद्र क्रमांक 2 च्या आजू बाजूला गा जर गवत वाढल्यामुळे या परिसरात डेंग्यू मच्छर निर्माण होत असून या केंद्राच्या समोर नालीची सुध्दा दूर अवस्था झाली आहे. अंगणवाडी केंद्राला वाल कंपाऊंड लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित सरदार यांनी राज्य मंत्री तथा पालकमंत्री अकोला यांच्याकडे मागणी केली असून याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन तर्फे कळविण्यात आले की वाल कंपाऊंड साठी शासनाकडून निधी उपलब्ध नाही तरी अंगणवाडी केंद्राला वाल कंपाऊंड तत्काळ लावण्याची मागणी सर्वस स्तरातून होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *