जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्याचे नवीन बसस्थानक महिलांसाठी असुरक्षित…

एरंडोल :- सबला उत्कर्ष प्रतिनिधी ( संजय चौधरी ) : एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नवीन बसस्थानकातील सर्व दिवे रात्री बंद असतात. यामुळे सर्वत्र अंधार असतो. परिणामी महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवून बस स्थानकावरील दिवे रात्रभर सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी अशी मागणी आहे.

येथील नवीन बस स्थानकावरील लाइट तीन ते चार दिवसांपासून बंद रहात अाहेत. यामुळे सायंकाळ होताच सर्वत्र अंधार पसरतो. परिणामी एसटी महामंडळाच्या बसेसने ये-जा करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते.

सायंकाळनंतर काही दारुड्यांचा देखील बसस्थानक परिसरात वावर असतो. अंधाराचा फायदा घेवून काही रोडरोमिओ या भागात अश्लील कृत्य करतात. बसस्थानकाच्या सर्व बाजूनी काटेरी झुडपे वाढल्यामुळे भुरट्या चोरांना देखील लपण्यासाठी अंधाराचा फायदा होतो. तसेच बसस्थानकावर नुकत्याच लावलेल्या अनेक फरशा व टाइल्स तुटल्या असून अंधारामुळे अनेक प्रवासी त्यावरून पाय घसरून अथवा ठेच लागून पडतात. दरम्यान, बसस्थानक राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे येथे रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बस स्थानकावरील बंद पथ दिव्यांची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *