कोरोना पेशंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ची बिलं……

कोरोना पेशंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ची बिलं.
_डॉ. स्वप्नील मानकर, यवतमाळ

     सरकारने प्रायव्हेट हॉस्पिटल वर कोरोना च्या बिलांवर निर्बंध लावल्यानंतरही काही हॉस्पिटलचे बिल जास्त येत आहे म्हणून पेशंटची नाराजी दिसत आहे परंतु सत्य परिस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे त्याकरिता लिहिलेला हा लेख

सरकार ने ठरवून दिलेले दर खालीलप्रमाणे आहेत
A. साधा पेशंट ( symptomatic )
4000 रुपये प्रति दिवस
B.मॉडरेट सिरीयस पेशंट ज्याला सिम्टम्स आहे
7000 प्रति दिवस आणि
C. सिरीयस पेशंट ज्याला ICU ची गरज आहे
9000 प्रति दिवस
याच्यामध्ये जनरल मेडिसिन, जनरल रक्त तपासण्या, एक्स रे ,डॉक्टरची फी, नर्सिंग ची फी, आणि सलाईन वगैरे सर्व समाविष्ट आहे,
परंतु महागडी औषधे, इंजेक्शन, रक्ताच्या महागड्या तपासण्या, व इतर तपासण्या जसे सिटी स्कॅन सुपर स्पेसिएलिस्ट डॉक्टर ची विझिट वगैरे हे सर्व वगळण्यात आलेले आहे
आता साधारणतः लागणाऱ्या इतर गोष्टी

  1. पीपीई किट :- पीपीई किट डॉक्टर किंवा इतर कर्मचारी फक्त एकदाच वापरू शकतात. म्हणजे रोटेशन मॉर्निंग एव्हीनिंग नाईट पद्धतीने ड्युटी विचार केला तर कमीतकमी तीन ड्युटी डॉक्टर दोन consultant आणि तीन सिस्टर आणि तीन वार्डबॉय तीन झाडू पोछा करणारी स्त्रिया, तीन स्विपर, कधीकधी इलेक्ट्रिसीएन नळ फिटिंग वगैरे वगैरे रोजच्या कमीतकमी 20 ते 30 पीपीई किट लागतात म्हणजे एक जनरल पेशंट च्या नावांवर दोन किंवा तीन पीपीई किट येईल. सिरीयस पेशंटसाठी मोठी टीम लागते मग जास्त लागतील, एक किटची किंमत 1200 ते 1500 असते हे समजून घ्यायला पाहिजे.
  2. मेडिसिन :-
    1.जनरल पेशंट ला जास्त औषधें लागत नाही तरीही अँटी वायरल घेतले तर अंदाजे 5000 लागू शकतात
  3. मॉडरेट पेशंटला इंजेक्शन अँटी वायरल लागते जे 5000 ला आहे ते 5 ते 7 दिवस देतात आणि त्यानंतर ओरल देतात ते 5 ते 10 हजाराचे होऊ शकते
  4. सिरीयस पेशंटला tocilizumab नावाचे इंजेक्शन दिले तर ते जवळपास 45000 रुपयांचे आहे आणि त्याचे तीन डोज लागतात सोबत वरील मॉडरेट गटातील सर्व औषधें सोबत व्हेंटिलेटर साठी लागणारी औषधें आणि हायर अँटीबायोटीकस ते सुद्धा महागडी असतात
    त्यामुळे साधारणता सर्व पेशंटचे अंदाजे बिल खालील प्रमाणे बनेल

A. जनरल पेशंट ( 14 दिवस) :-
1.रूम चार्ज- 4000X14=56000
2.पीपीई किट अंदाजे 2
3000X14=42000
3.रक्त तपासण्या
5000X2=10000
4.सिटी स्कॅन एक किंवा 2 वेळा
4000X1-2=4000-8000
5.औषधी लागणार नाही पण अँटीवायरल गोळ्या दिले तर 5000
जनरल पेशंट एकूण अंदाजे बिल
1,10,000 -1,30,000 एवढे होऊ शकते

B. मॉडरेटली सिरियस पेशंट (14 ते 21 दिवस :-

  1. रूम चार्ज- 7000X14=98000
  2. पीपीई किट 2 ते 3 रोज
    3000-4500X14=42000-63000
    3.रक्त तपासण्या
    5000X2ते4वेळा =10000-20000
    4.सिटी स्कॅन 2 ते 4 वेळा
    4000X2-4 =8000-16000
    5.औषधी :-
    Antiviral injection 5000X5 =25000
    त्यानंतर ओरल मेडिसिन = 10000
    मॉडरेट पेशंट एकूण बिल
    14 दिवसाचे 190000 -2,35000 आणि
    21 दिवसाचे 2,50,000-3,70,000 होऊ शकते

C.सिरीयस पेशंट (14 ते 28 दिवस) :-
1.रूम चार्ज -9000X14=98000

  1. पीपीई किट 3 ते 5 रोज कारण मोठी टीम लागते
    4500-7500X14=63000-105000
  2. रक्त तपासण्या
    5000X5 ते 10 वेळा =25000-50000
  3. सिटी स्कॅन 4 ते 6 वेळा
    4000X4-6 =16000-24000
  4. औषधी :-
    Tocilizumab injection- 45000X3=135000
    Higher antibiotics 5000 to 10000 दर दिवसाला
    5000-10000x 14= 70000-140000
    Antiviral injection 5000X5 =25000
    त्यानंतर ओरल मेडिसिन = 10000
    सिरीएस पेशंट एकूण बिल
    14 दिवसाचे 4,40,000 ते 5,75,000 आणि
    21 दिवसाचे 6,60,000 ते 8,75000 होऊ शकते आणि कधी कधी 28 दिवस सुद्धा लागतात
    वरील सर्व आकडे हे सर्वसामान्य माणसाला अंदाज येण्यासाठी दिलेले आहेत. हे पक्के नाहीत, याव्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी वेळेवर उद्भवू शकतात त्या इथे धरता येणार नाही.
    __डॉ. स्वप्नील मानकर, यवतमाळ
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *