जातिवाचक शिवीगाळ चा दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी व ठाणेदार यांनी संगनमत करून फिर्यादी च्या भाच्या विरूध्द केला विनयभंग चा गुन्हा दाखल …..

जातिवाचक शिवीगाळ चा दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी व ठाणेदार यांनी संगनमत करून फिर्यादी च्या भाच्या विरूध्द केला विनयभंग चा गुन्हा दाखल

सबला उत्कर्ष अकोला प्रतिनिधी:ऋषभ काळे


अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निंबी चेलका या गावात राहणाऱ्या एका विधवा महिलेने याच गावातील राहणारा रणजित देवलाल दहात्रे ,महादेव चव्हाण रा. निंबि चेल का या दोन्ही आरोपी विरुद्ध भा. द.वी. कलम 354 अ ,324,504,506,427,जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी बार्शी टाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीची कोर्टनी जमानत मंजूर केली होती.परंतु फिर्यादी महिला व तिचा भाच्यां ने पोलिसांकडे पत्रव्यवहार करून आपल्यावर गुन्हा दाखल करून कारागृहात पाठवले. हा राग आरोपी रणजित दहात्रे याने मनात ठेऊन कारागृहातून बाहेर आल्यावर फिर्यादी व लेखक अमित सरदार (भाचा) यांना वारंवार धमकी देऊन म्हटल की माझ्यावर ची केस मागे घे.नाहीतर मी तुला व तुझ्या भाच्याला जीवाने मारून टाकील. नाहीतर तुझा भाचा अमित सरदार हा तुला पत्रव्यवहारात खूप मदत करतो .याला माझ्या पत्नीला हाताशी धरून त्यांच्यावर विनयभंग चा गुन्हा दाखल करेल.अशी धमकी आरोपीने दिली होती.या धमकी बाबत जाती वाचक शिवीगाळ प्रकरणातील फिर्यादी महिलेने पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते. व पोलीस सुरक्षा देण्याचे फिर्यादी महिलेने भाचा मार्फत पोलिस अधीक्षक यांना पत्र दिले होते.तसेच या प्रकरणात पोलीस नियंत्रण कक्ष 07242435500 या क्रमांकावर सुध्दा फोन करून माहिती दिली होती.बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांची बदली करण्याची मागणी फिर्यादी ने केली होती . सदर अर्जावर कोणती कारवाही करण्यात आली या प्रकरणाची लेखी माहिती घेण्यासाठी माहितीचा अधिकार 2005 या कायद्यानुसार पोलिस अधीक्षक यांना लेखी अर्ज देऊन माहितीची मागणी अमित सरदार यांनी केली. व सदर माहिती चा अर्ज हा अमित सरदार यांनी स्वतःच्या वॉट सअप वर स्टेटस ठेवला होता हाच स्टेटस बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी पाहाला व हा स्टेटस पाहून पित्त खवळ लेल्या ठाणेदार यांनी जाती वाचक शिवीगाळ प्रकरणातील आरोपी यांच्याशी संगण मत करून फिर्यादी महिलेचा भाचा याच्या विरोधात विनयभंगा चा गुन्हा दाखल केला.तरी ठाणेदार यांनी दाखल केलेला गुन्हा हा खोटा असल्याचा आरोप यांनी तक्रारीत केला. या प्रकरणाची उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *