अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कामकाजात सुधारणा नवनियुक्त रेशनकार्ड लिपिक तथा पुरवठा निरीक्षक निलेश कळसकर यांच्या नियुक्ती मूळे कार्यालयीन कामे जलद गतीने


सबला उत्कर्ष प्रतिनिधी अकोला महाराष्ट्र – ऋषभ काळे


अकोला तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नवीन रेशन कार्ड,नाव कमिकरणे,दुय्यम कार्ड ,नाव वाढवणे,या संदर्भातील कामे आता जलद गतीने होत असून अर्ज दारांना चांगली सेवा मिळावी या हेतूने या विभागात नवनियुक्त रेशनकार्ड लिपिक तथा पुरवठा निरीक्षक निलेश भास्कर कळसकर यांनी जनतेचे अर्ज जलद गतीने निकाली काढण्याचा उपक्रम हाती घेतला असून नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी जनतेकडून प्राप्त अजासोबत सादर कागद पत्रे तत्काळ चौकशी करून रेशन कार्ड या विभागामार्फत तत्काळ वितरीत करण्यात येत आहे.त्या मुळे विधवा महिला व वृद्ध नागरिकांना या महत्त्वाच्या उपक्रमामुळे दिलासा मिळाला आहे.यापूर्वी तत्कालीन रेशन कार्ड लिपिक यांच्या कार्य काळात नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज दारांना वारंवार चकरा माराव्या लागत होत्या.तसेच नागरिकांना नाहक त्रास होत होता.या प्रकरणी वरिष्ठांकडे जनतेकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तत्कालीन रेशन कार्ड लिपिक वैभव जोहरे याची बदली केली. व त्या जागेवर कर्तव्य दक्ष अधिकारी नीलेश भास्कर कळसकर यांची नियुक्ती केली .नियुक्ती होतास पुरवठा विभागा च्यां कामकाजात सुधारणा झाल्याचे आढळून येत आहे.नवनियुक्त रेशनकार्ड लिपिक यांची जलद गतीने कामकाज करण्याची पद्धत पाहून अर्ज दार कडून प्रशासनाचे कामकाज आता सुधारले असे कौतुक केले जात आहे

नवनियुक्त रेशनकार्ड लिपिक तथा पुरवठा निरीक्षक निलेश कळसकर
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *