दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे दि.14 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद मध्ये आयोजन – केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले

 मुंबई दि.12- आंबेडकरी चळवळीत ऐतिहासिक ठरलेल्या दलित पँथर या क्रांतिकारी संघटनेच्या  सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या  सांगता सोहळ्याचे दि.14 ऑक्टोबर रोजी सायं.5 वा.औरंगाबाद येथील आमखास मैदानात आयोजन  करण्यात आले आहे. दलित पँथर सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्या निमित्त आयोजित भव्य मेळाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले करणार आहेत. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे महाराष्ट्र राज्य कार्यध्यक्ष बाबुराव कदम उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपांइ तर्फे करण्यात आले आहे.                        

  दलित पँथर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना होऊन 50 वर्ष पूर्ण झाली.त्यानिमित्त रिपब्लिकन पक्षा तर्फे केंद्रिय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात दलित पँथरचा सुवर्ण महोत्स साजरा करण्यात आला.राज्यभर दलित पँथरचे सुवर्ण महोत्सव मेळावे आयोजित करण्यात आले. मुंबई,ठाणे,नाशिक,नागपूर,जळगाव,पालघर; सातारा आदि ठिकाणी राज्यभरात ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त मेळावे घेण्यात आले. दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा दि.14 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, मधील आमखास मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात दलित पँथर मध्ये काम केलेल्या ज्येष्ठ पँथर्स चा  सत्कार ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.                          

या मेळाव्याचे उद्घाटक केंद्रिय राज्य मंत्री ना.रामदास आठवले असून अध्यक्ष बाबुराव कदम आहेत.या मेळाव्यास साहित्यिक विचारवंत अर्जून डांगळ,ऋषिकेश कांबळे,रिपांइ चे राज्य अध्यक्ष राजा सरवदे,शरणकुमार लिबांळे, रिपांइ राज्य सरचिटणीस गौतन सोनावणे,दिलीप जगताप,पत्रकार दिवाकर शेजवळ,पप्पू कागदे,विजय सोनावणे,मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके,दौलत खरात,ब्रम्हानंद चव्हाण,किशोर थोरात,डि.एन.दाभोडे,चंद्रकांत चिकटे,राजा ओव्हाळ,सिद्धार्थ भालेराव,भास्कर रोडे,संजय बनसोडे आदि मान्यंवर उपस्थित राहणार आहेत.या कार्पामाचे संयोजक जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ,शहर अध्यक्ष नागराज गायकवाड,युवा जिल्हाधयक्ष राकेश पंडित,अरविंद अवसरमण,दिलिप पाडमुख,विजय मगरे,प्रविण नितनवरे,आमोल नरवडे,मनोज सरिन,लक्ष्मण हिवराळे,देवराज विर आहेत अशी माहिती कार्पामाचे अध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *