रिपब्लिकन पक्षाच्या लीगल सेल च्या अध्यक्षपदी  ऍड.विजय ठाकूर यांची अधिकृत नियुक्ती – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 मुंबई दि.11 –  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश लीगल सेल च्या अध्यक्ष पदी मुंबईतील प्रसिद्ध वकील विधिज्ञ ऍड. विजय ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली. ऍड.विजय ठाकूर हे मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ त्यांना विधी क्षेत्राचा अनुभव आहे.माफक दरात त्यांनी अनेक गरजू गरिबांच्या केसेस लढल्या आहेत.अनेक जटिल केसेस त्यांनी सोडवल्या आहेत. अत्यंत अभ्यासु बुद्धिमान अनुभवी यशस्वी वकील म्हणून ऍड.विजय ठाकूर यांची ख्याती आहे.राज्यभरातील  विधीज्ञ वकिलांची एकजूट करून त्यांचे संघटन पुढे घेऊन जाण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या लीगल सेल च्या अध्यक्षपदाची जबाबदारी ऍड विजय ठाकूर यांच्यावर सोपवली आहे असे ना.रामदास आठवले यांनी आज सांगितले.बांद्रा पूर्वेतील ना.रामदास आठवले यांच्या जनसंपर्क कार्यालयात ऍड.विजय ठाकूर यांना लीगल सेल च्या अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र  देण्यात आले.यावेळी पुष्पगुच्छ देऊन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते ऍड.विजय ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. ऍड.विजय ठाकूर यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश लीगल सेल च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.    

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *