जळगावात शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक ; गुन्हा दाखल.

जळगावात शेतकऱ्याची १ लाख ३० हजारात फसवणूक ; गुन्हा दाखल.

जळगाव : सबला उत्कर्ष ( मयूर वागूळदे ) – शहरातील एका शेतकऱ्याची १ लाख ३० हजार रुपयांत फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात माहिती अशी की, जळगावातील रहिवासी अशोक विश्वनाथ बारसे (वय-५०) रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ शिवाजी नगर हे शेतकरी आहेत. शेतीच्या कामासाठी त्यांना ट्रक्टरची आवश्यकता असल्याने त्यांचा मित्र धनराज भगवान करे रा. जळका ता.जि.जळगाव यांच्या ओलक्स ॲपवर दाखविलेल्या ट्रक्टर अशोकसिंग गुजर यांचे असल्याचे समजले. दोघांनी नंतर ओएलएक्सच्या साईटवर जावून त्यांची संपुर्ण माहिती संकलीत केली.
अशोक सिंग गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करुन बोलणी झाली. त्यानुसार अर्धी रक्कम अगोदर दिल्यावर ट्रॅक्टर देतो, त्याच दिवशी उर्वरीत रक्कम द्यावी असे तोंडी बोलणीत ठरले होते. त्यानुसार बारसे यांनी १६ नाहेंबरला व लगेच दुसऱ्या दिवशी १७ नाहेंबर ला नरेश कुमार याचे कॅनरा बँक खात्यावर आणि हनुमंत गायकवाड याच्या खात्यावर दानाबाजार शाखेच्या स्टेटबँकेतून ऑनलाईन पद्धतीने १ लाख ३० हजार रुपये वर्ग केले.

बोलणी झाल्यानंतरही अशोक सिंग नावाच्या व्यक्तीने ट्रॅक्टर देण्यास नकार देत उडवा उडवीची उत्तरे देत टाळून लावले. फसवणुक झाल्याचे निष्पन्न होताच अशोक सींग गुर्जर विरोधात शहर पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. भिमराव नादुरकर करीत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *