राज्यातील ३५ टक्के शाळा भरल्या, मात्र विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद…

राज्यातील ३५ टक्के शाळा भरल्या, मात्र विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद…

*मुंबई:* सबला उत्कर्ष प्रतिनिधी :-
राज्यात सोमवापरसून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. याबाबत अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाचा असला, तरी शहरी भाग वगळता बहुतांश ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. परिणामी सोमवारी राज्यातील ३५ टक्के शाळा भरल्या मात्र तेथे विद्यार्थ्यांची उपस्थिती अवघी पाच टक्केच होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अखेर सोमवारी राज्यातील काही जिल्ह्यांमधील सुमारे ३५ टक्के शाळांची पहिली घंटा वाजली. सुमारे दोन लाख ९९ हजार १९३ विद्यार्थांनी सोमवारी शाळेत हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयानंतरही मुंबई, पालघर, ठाणे, पुणे शहर, जळगाव, हिंगोली, नांदेड, नाशिक, परभणी या जिह्यातील शाळा कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील जालना, रायगड, गडचिरोली, भंडारा, सांगली, उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, अमरावती, सिंधुदुर्ग, वर्धा या जिह्यातील शाळा सुरु झाल्या. *शिक्षण विभागाकडून ३५ जिल्ह्यांच्या मिळालेल्या माहितीनुसार २५ हजार ८६६ शाळांपैकी नऊ हजार १२७ शाळा आज सुरु झाल्या. राज्यातील दोन लाख ७५ हजार ४७० शिक्षकांपैकी एक लाख ४१ हजार ७२० शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे. तर यापैकी १३५३ शिचकांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर ४४ हजार ३१३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी २९० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्या आहेत.* दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पहिल्या दिवसाचा आढावा घेतला. तसेच एक दिवस आड करून विद्यार्थी शााळेत उपस्थित राहणार आहेत. शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गही चालू राहणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *