पाचोरा शहरात अनेक महिलांसह युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश…

शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख उर्मिला शेळके व शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांचे हस्ते प्रवेश समारंभ संपन्न
सबला उत्कर्ष प्रतिनिधी भावेश पाटील :

पाचोरा : सबला उत्कर्ष – स्वर्गवासी हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा आदर्श घेऊवुन शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात ८०% समाज कारण व २०% या उदारता हेतूने मतदारसंघात विकास गंगा आणली आमदार पाटील यांचे कुशल नेतृत्व स्विकारत शिवतीर्थ शिवसेना कार्यालय येथे शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख उर्मिला शेळके व शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहरातील अनेक महिलांनी शिवसेना महिला आघाडीत व युवकांनी शिवसेनेचा भगवा ख्यावर घेऊन प्रवेश केला . यावेळी नव्याने सामील झालेल्या महिलांनी व युवकांनी आपल्या मनोगतात सांगीतले की यापुढे आम्ही शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू व पक्षाशी एकनिष्ठ होऊन काम करू असे सांगितले .
यावेळी जया विशाल पवार,पिंकी चंदन पारोचे, संगिता दिपक घारू, सपना आकाश चव्हाण,शितल रणजीत चनाडे,शितल नितीन सारसर,आकाश अनिल चव्हाण,सागर दिलीप पारोचे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला व यावेळी सुभाष अण्णा ,विशाल राजपुत,श्रीराम पाटील, नाना वाघ, विजय भोई, नाना वाघ, वैभव राजपूत, उपस्थित होते.

शिवसेना कार्यालयात प्रवेश करतांना शिवसैनिक पाचोरा…
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *