महात्मा फुले जन आरोग्य संकुलाची पाहणी करताना खासदार उन्मेश पाटील…

चाळीसगाव – सबला उत्कर्ष ( संजय चौधरी ) :खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय इमारतीस पदाधिकारी यांनी भेट दिली असता .

ग्रामीण रुग्णालय इमारतीस भेट देताना.

महात्मा फुले उपजिल्हा रुग्णालय उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य सुविधा देणारे सर्वोच्च रुग्णालय येत्या काळात सिद्ध होणार असून हा अतिशय भव्य दिव्य हवेशीर व रुग्णांना बरे होण्यासाठी पोषक वातावरण असलेला परिसर चाळीसगाव तालुक्याचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणार असल्याची भावना आज ट्रामा केअर सेंटर येथे रोटरी क्लबच्या माझ्या अध्यक्षांच्या भेटीप्रसंगी व्यक्त केले आज रविवारी दुपारी एक वाजता महात्मा फुले जन आरोग्य संकुलात रोटरी अध्यक्ष प्रकाश नाना कुलकर्णी, माजी अध्यक्ष रवींद्र भाऊ शिरोळे, रोटरी माजी अध्यक्ष तथा गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरिष दवे ,रोटरी क्लब ऑफ संगमचे अध्यक्ष तथा भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन प्रा. ऊमाकांत ठाकूर , रोटरी कोषाध्यक्ष आधार महाले यांनी आज ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयाच्या भव्य वास्तूची वास्तु भेट देऊन खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रति आभार व संहवेदना व्यक्त केली यावेळी कोविड सेंटरचे नोडल अधिकारी रणजित गव्हाळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

रेडिमेड रुग्णालय होते म्हणून डेडीकेटेड कोविड सेंटर करता आले
आजी माजी अध्यक्षांनी खासदार उन्मेश दादा बद्दल व्यक्त केली कृतार्थ भावना

ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालय हा महात्मा फुले जन आरोग्य संकुलाच्या विस्तीर्ण परिसर हा तारांकित हॉस्पिटल पेक्षा अतिशय सुंदर आखीव रेखीव व रुग्णांना मानसिक दिलासा देणारा असून खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीतून तयार झालेले हे जन आरोग्य संकुल येणारे प्रदीर्घ काळ जनतेची आरोग्याची मौलिक गरज पूर्ण करणार असून खासदार उन्मेश दादा पाटील यांची या जनतेच्या प्रती असलेला आदर व तळमळ भावनेतून तयार झालेले भव्यदिव्य रुग्णालय हे शंभर वर्षापेक्षा अधिक काळ तालुक्याच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी व तालुका वासियांच्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर राहील.
तसेच कोरोना महामारीच्या प्रसंगात रेडिमेड रुग्णालय होते म्हणून डेडीकेटेड कोविड सेंटर करता आले असा भावना यावेळी माजी अध्यक्ष व आयुर्वेद वैद्यकीय सेवेतले नामांकित डॉ. हरिष दवे यांनी व्यक्त केला आहे.

रोटरी क्लब मिल्क सिटी व रोटरी क्लब ऑफ संगम आजी माजी अध्यक्षांनी यावेळी खासदार उमेश दादा पाटील यांना कोविड सेंटरमध्ये ज्या काही वस्तूंची गरज असे त्याबाबत आम्हाला मार्गदर्शन करावे आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून या वस्तूरुपी सेवा उपलब्ध करून देऊ अशी अपेक्षा व्यक्त केली.
खासदार उन्मेश पाटील यांचे आजी माजी अध्यक्षांनी चाळीसगाव वासियांसाठी भव्य दिव्य कोविड सेंटर उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *