धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या…

पटणा – 1/10/2020 : सबला उत्कर्ष न्यूज नेटवर्क :- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील तेजप्रताप नगरात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील तेजप्रताप नगरात गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
भारतीय जनता पक्षाचे (BJP) जयंत मंडलचे उपाध्यक्ष राजेश कुमार झा उर्फ राजू बाबा हे मॉर्निंग वॉकला गेले असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राजेश कुमार झा यांचा जागेवरच मृत्यू झाला. बेउर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तेजप्रताप नगरातील सीताराम उत्सव हॉलजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दरम्यान, राजेश कुमार झा यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांचा कुणासोबत वाद होते का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. भाजप नेत्याच्या नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
पोलिसांनी राजेश कुमार झा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही ठोस सांगता येईल, अशी माहिती बेउर पोलिस स्टेशनचे प्रभारी फुलदेव चौधरी यांनी दिली आहे.
दरम्यान, निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे.बिहारमध्ये सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल व भाजपच्या आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे यावेळीही नितीश कुमार यांचं पारड जड मानलं जात आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *