अहेरीत रक्तदान शिबिर राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिले…

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ( सबला उत्कर्ष न्यूज )

अहेरी :– येथील स्नेहा लॉन मध्ये रविवार 27 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
आमदार धर्मराव बाबा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी सुद्धा रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिले होते.


या प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू असून असंख्य रुग्णांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते त्यामुळे युवकांनी स्वयंस्फूर्तीने शिबिराचे आयोजन करून रक्तदान शिबिर जागोजागी राबविण्याचे यावेळी आवाहन करून रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे उल्लेख यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
सदर रक्तदान शिबिरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्यासह सुरेंद्र अलोने, श्रीनिवास मगडीवार, अजय गोवंशी, शुभम चिंतावार, आदित्य जक्कोजवार, नभीत ढोलगे, वसुंधरा शेंडे, दिगंबर गलबले, संतोष बोम्मावार, मिलिंद मेश्राम आदींसह अन्य युवकांनी रक्तदान केले.


शिबिरासाठी डॉ.रवि वाटोळे, सरिता वाघ, शिरीन कुरेशी, रश्मी मारगोनवार, शरद बांबोळे,मना शेख आदी वैद्यकीय चम्मूनी आणि पूर्वा दोंतुलवार, हर्षाली दलाई,महेश अलोने, सुमित मोतकूलवार, राहुल गर्गम, प्रणय अलोने, विमल गावडे, सुवर्णा पुसालवार, विमल गावडे आदींनी सहकार्य केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *