दलित पँथरमध्ये फुट पडली नसती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले असते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

दलित पँथरमध्ये फुट पडली नसती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले असते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 02- दलित पँथर ही क्रांतीकारी संघटना स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात संपूर्ण जगात पोहचली होती. दलित पँथरमध्ये राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांचे दोन गट पडले. त्यानंतर राजा ढाले यांच्या गटातुन भाई संघारे, अविनाश महातेकर, दिलीप जगताप, हे बाहेर पडुन तिसरा गट स्थापन झाला. दलित पँथरमधील वाद एकत्र बसुन मिटवले असते, दलित पँथर एकसंघ राहिली असती. जर दलित पॅंथरमध्ये फुट पडली नसती तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले असते असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहात रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळयात ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अविनाश महातेकर आणि त्यांच्या पत्नी सौ. उल्का महातेकर यांचा ना. रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दलित साहित्यातील कविता, कथा रक्तबंबाळ शब्दांनी व्यापलेले होते. दलित साहित्याच्या शब्दाशब्दात क्रांती ठासून भरलेली होती. मात्र प्रत्यक्ष क्रांतीसाठी साहित्यासोबत संघटनेची गरज असते. त्यामुळे दलित साहित्यीकांनी मिळून दलित पँथर या क्रांतीकारी आक्रमक संघटनेची स्थापना केली. दलित पँथरच्या स्थापनेच्या प्रवाहात अविनाश महातेकर सुध्दा प्रमुख नेते होते. दलित पँथरपासुन रिपब्लिकन पक्षापर्यंत 50 वर्ष अविनाश महातेकर यांनी आंबेडकरी चळवळीत स्वतला झोकुन दिले आहे. कार्यकर्ता, नेता, विचारवंत म्हणून तसेच साहित्यीक संपादक अशा विविध रुपात अविनाश महातेकर यांनी आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान दिले आहे. त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार माझ्या हस्ते होतोय याचा मला आनंद आहे असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.

अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे हे जेवढी वर्षे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राहिली असतील त्यापेक्षा अधिक काळ ते माझ्या सोबत राहिले आहेत असे ना. रामदास आठवले म्हणाले. यावेळी राज्यभरातील हजारो रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी अविनाश महातेकर यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *