माजी जलसंपदामंत्री आ. गिरीश महाजन यांच्या कारचा अपघात बाईक चालक गंभीर जखमी…

पाचोरा : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील लोहारी-वरखेडे गावाच्या दरम्यान माजी जलसंपदामंत्री आ. गिरीश महाजन यांच्या कारने एका दुचाकीस्वाराला उडविले. यात अपघातात वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बी.सी. पवार हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली नसून जखमीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पाचोरा तालुक्यात लोहारी गावाच्या दरम्यान भाजप नेते माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांच्या इनोव्हा चारचाकी गाडीला एका दुचाकीस्वाराने मागून जोरदार धडक दिलेली आहे. असे सूत्रांकडून समजते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी एकच गर्दी केली. आ. महाजन यांनी स्वतः त्यांच्या इनोव्हा गाडीत टाकून पाचोरा येथील विघ्नहर्ता रुग्णालयात दाखल केलेले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *