साकळीत अवैध धंद्यांना आलाय ऊत! पोलीस प्रशासन मात्र चूप!

यावल : सबला उत्कर्ष न्यूज :- 27 सप्टेंबर रोजी रविवार ला गाव बंदचे आवाहन साकळी ग्रामपंचायत ने केले असता गावातील अवैध धंदे जोरदार सुरु आहेत. गावातील अनेक दुकाने बंद असताना मात्र दारू दुकाने, हॉटेल, ढाबे जोरदार सुरू आहेत. तर गाव बंद केल्याचे आवाहन निष्क्रिय ठरत आहे. असा आरोप गावातील रहिवाश्यांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकळी गावात सर्वत्र व्यावसायिक यांनी आपले दुकाने बंद ठेवली असून गावातील अवैध धंदे मात्र जोमात सुरू आहेत.

तसेच परवाना धारक असेलेले दारू दुकान सुरू असल्याचे गावातील नागरिकांकडून बोलले जात आहे. तर साकळी फाट्यावर असलेले ढाबे, हॉटेल्स मात्र जोरदार सुरू आहेत.

तसेच या ठिकाणी रविवार असल्याने मद्यपींची संख्या जास्त प्रमाणात ढाबे, हॉटेल्स ला जात असून या अवैध दारू विक्री करणाऱ्या मालकांवर पोलीस प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याने तसेच सूत्रांकडून गावात पोलीस प्रशासनाचा पंटर हफ्ते घेत असल्याचा आरोप साकळी फाट्यावर असलेल्या एका हॉटेल्स धारकाकडून सांगण्यात आले आहे.

यावर साकळी यावल येथील पोलीस प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच काही नागरिकांचे असे म्हणणे पडले की, गावातील दारू दुकाने, हॉटेल्स सुरू आहेत तर आम्हाला सुद्धा धंदा करण्यास का मनाई केली जात आहे. किंवा बंदचे आवाहन ग्रामपंचायत करत असेल तर सर्वकाही एक दिवसासाठी बंद का ठेवत नाही. सुरू असलेल्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची कारवाई का केली जात नाही असा आरोप नागरिकांकडून होत आहे.तर गावातील विरोधक या गोष्टींवर एकही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. असा ही सवाल रिड जळगाव विचारत आहे. संबंधित अधिकारी, यावल पोलीस निरीक्षक साहेब यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *