गॅस दर वाढ मुळे केंद्र सरकार विरोधात महिला आघाडी चे जळगांव जिल्ह्यात जोरदार आंदोलन…

जळगाव : सबला उत्कर्ष ( संजय चौधरी ) :- आज दि. २८-१२ -२०२० रोजी आ. प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या
आदेशानुसार डिसेंबर महिन्यात दोन वेळा एल. पी. जी गॅसच्या किंमत वाढ झाल्याने , IOC च्या वेबसाईटवरील माहितीनुसार महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारने दरवाढ केली. पेट्रोल व डिझेल मध्ये सातत्याने लूट होत असून. दरवाढीचा त्रास सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना होतोय कोरोनाकाळात आर्थिक स्थिती मंदावली असतांना सरकार जीवनाश्यक वस्तूंमुळे सर्व सामान्य जनतेची गळचेपी होत आहे.फेबु. मध्ये घरगुती सिलेंडर 50 रु . महाग झाले असून 5 k सिलेंडर 18 रु महाग झाले तसेच 19 k सिलेंडर 36.50 रुपयांनी महाग झालेय अशा परिस्थिती जगायचे कसे कोरानाच्या महामारी मध्ये महामंदी असतांना सर्वसामान्य ची लूट होत आहे इतिहासात पहिल्यादाच शेतकरी ही आंदोलने करतच आहे या विषयी मोदी- केंद्र सरकारचा निषेध चुलीवर भाकऱ्या थापून नोंदविण्यात आला.

यावेळी सौ. वंदना ताई चौधरी प्रदेश सचिव , जिल्हाध्यक्ष कल्पना ताई पाटील ,श्रीमती मिनाक्षी चव्हाण उपाध्यक्ष , सौ. ममता तडवी सरचिटणीस, सौ. कमलताई पाटील सरचिटणीस, रयसाबी पटेल सरचिटणीस, श्रीमती शकुंतला धर्माधिकारी सचीव, सौ. कोमल महाजन, सरला पाटील, मनिषा गव्हारे, गंगुबाई शेळके,राणी सविता छान, रेश्मा छान, मेहंदी जान, अर्चना छान व कल्याणी जान हे किन्नर उपस्थित होते.

सौ. वंदना अशोक चौधरी
प्रदेश सचिव राष्ट्रवादी महिला काँग्रेस तथा
बुलढाणा निरीक्षक

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *