लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, तरी मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी तो…

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, तरी मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी तो…

पुणे : मयूर वागूळदे ( सबला उत्कर्ष ) :- मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना फिरविण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune Police arrested Bike Thief)
सौरभ दत्तात्रय चोरगे (वय २०, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या तरुणाचा नाव आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून गस्त सुरू होती. त्यावेळी पोलिस हवालदार कुंदन शिंदे व सागर सुतकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन शिवदर्शन परिसरातील वसंतराव बागुल उद्यान कमानीपासून पुढे असलेल्या पुलावर थांबला आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्यावेळी त्याने त्याचे नाव चोरगे असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. त्यावेळी ती दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने दत्तवाडी व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.
चोरगे हा बारावीपर्यंत शिकला आहे. लॉकडाऊनपूर्वी तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. पण, लॉकडाउनमुळे नोकरी गेली. आरोपीला अनेक मैत्रिणी आहेत. त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना दुचाकीवर घेऊन फिरण्यासाठी त्याने दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. त्याने आतापर्यंत मैत्रिणीसाठी पाच दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्याकडे आणखी तपास सुरू आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *