स्वॅब कलेक्शन असल्याने चार हजार चाचण्या अशक्यच नंदुरबारच्या आर टी पी सी आर मशीनमध्ये होतात ४०० टेस्ट…

स्वॅब कलेक्शन असल्याने चार हजार चाचण्या अशक्यच नंदुरबारच्या आर टी पी सी आर मशीनमध्ये होतात ४०० टेस्ट.

नंदुरबार – सतिष तायडे ( सबला उत्कर्ष ) :- राज्यशासनाने प्रत्येक जिल्याची टेस्ट व्हाव्यात अशा सूचना केल्या आहेत परंतु नंदुरबार जिल्यात हे अशक्य असल्याचे चित्र आहे. आर टी पी सी आर ६० तर अँटीजेन ४० टक्के करण्याचे सूचित करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील स्वॅब टेस्टिंग करणाऱ्या लॅब मध्ये कर्मचाऱ्यांची कमी असल्याने चाचण्यांचे टार्गेट पूर्ण होणं अशक्य आहे
या तुलनेत जिल्यात दर दिवशी सरासरी १ हजार चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे याचे निकाल काही वेळात प्राप्त होत असल्याने रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असली तरीही स्वॅब कलेक्शन वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यातून आर टी पी सी आर लॅबमध्ये काम करणारे सात टेक्निशियन आणि दोन डॉक्टर असे ९ जण या लॅबमध्ये दिवसभरातून १२ तास काम करत असल्याची माहिती देण्यात अली आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *