भुसावळ बसस्थानकाच्या स्लॅबचे तुकडे कोसळून प्रवासी होताय जखमी, बस आगाराचे दुर्लक्ष…

भुसावळ बसस्थानकाच्या स्लॅबचे तुकडे कोसळून प्रवासी होताय जखमी, बस आगाराचे दुर्लक्ष.

भुसावळ : मयूर वागूळदे ( सबला उत्कर्ष ) :- येथील बसस्थानकाची दोन दशकांपूर्वी उभारलेली इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे छताच्या स्लॅबचे तुकडे कोसळून प्रवासी जखमी होत आहेत. गेल्या आठवड्यातच यावल येथील प्रवासी महिलेच्या डोक्यावर स्लॅबचा तुकडा कोसळून महिला जखमी झाली होती. या घटनेनंतरही आगार व्यवस्थापनाने बोध घेतला नाही. अद्यापही स्लॅबची डागडुजी न झाल्याने पुन्हा दुर्घटनेचा धोका वाढला आहे.

गेल्या आठवड्यात यावल येथील प्रवासी महिला परवीनबी फारुक खाटीक (वय ५१) यांच्या डोक्यावर स्लॅबचा तुकडा कोसळून त्या जखमी झाल्या होत्या. तर या दुर्घटनेत दोन प्रवासी सुदैवाने बचावले होते. शहरातील बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला.

कोरोनामुळे सध्या मुळातच प्रवाशांची संख्या कमी आहे. यामुळे बसस्थानकात नेहमीप्रमाणे गजबज नव्हती, अन्यथा या घटनेत मोठी हानी होण्याचीही भीती होती. या घटनेनंतर तत्काळ डागडुजी होणे अपेक्षित होते. जीर्ण इमारतीच्या स्लॅबचे भागातील तुकडे पडून आतील लोखंडी सळई दिसायला लागल्या आहेत. तर काही ठिकाणी थेट स्लॅबचे तुकडे पडत आहेत. त्यामुळे तत्काळ इमारतीची डागडुजी होणे गरजेचे आहे. प्रवाशी जखमी होत असतानाही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *