यावलच्या शेतकऱ्यांची साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या २ केळी व्यापाऱ्यांना अटक…

यावलच्या शेतकऱ्यांची साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या २ केळी व्यापाऱ्यांना अटक.

यावल :- सबला उत्कर्ष प्रतिनिधी : शहरातील ६ आणि तालुक्यातील २ शेतकऱ्यांची केळी खरेदी करून १३ लाख ६५ हजार रुपयांत फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष कांतीलाल पाटील व रवींद्र ओंकार सपकाळे असे या दोघांची नावे असून ९ पर्यंत त्यांना पोलिस कोठडी मिळाली.

१४ सप्टेंबर २०२० रोजी डॉ. गणेश लक्ष्मण रावते यांनी यावल पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार रावेर येथील दत्तगुरू केला एजन्सीचे मालक सुभाष कांतीलाल पाटील (रा.पुनखेडे, ता.रावेर, ह.मु भगवतीनगर जुना सावदा रोड) आणि सांगवी खुर्द (ता.यावल) येथील गणेश केला ग्रुपचे रवींद्र ओंकार सपकाळे या व्यापाऱ्यांनी ३ लाख ७ हजार ९६१ रुपयांची केळी विकत घेतली हाेती. देवनाथ पाटील, अरुणकुमार खेडकर, पराग सराफ, संदीप वायकोळे, संभाजी लावणे, नावरे येथील देविदास पाटील, महेंद्र पाटील अशा ८ शेतकऱ्यांची १३ लाख ६५ हजार ८४२ रुपयांची केळी विकत घेतली होती. मात्र, नंतर पैशांसाठी टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *