धरणगाव शिवसेना तर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोधात तीव्र आंदोलन…

धरणगाव शिवसेना तर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोधात तीव्र आंदोलन.


धरणगाव प्रतिनिधी, धनराज पाटिल :- सबला उत्कर्ष न्यूज – येथे केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधन दरवाढीचा विरोधात मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमून, पुतळ्याचे पूजन केले. उभा ठिकाणी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी उपस्थित जमावाला संबोधित करतांना केन्द्र सरकारवर टीकास्त्र सोडले. तेथून सर्व कार्यकर्ते पायी तहसील कार्यालयात गेले. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी ‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेगा तेल, चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव, अबकी बार पेट्रोल १०० के पार, पेट्रोल दरवाढ करणाऱ्या भाजपा सरकारचा जाहीर निषेध, रामाचा भरतात पेट्रोल ९५, तर रावणाचा लंकेत पेट्रोल ५१ अशा’ विविध घोषणा देऊन केंद्र सरकारच्या निषेध नोंदवला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी देशात कच्या तेलाचे भाव कमी असून पेट्रोल चे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना दळण वळण साठी पेट्रोलची आवश्यकता असते. शेतकऱ्यांची थट्टा करण्याऱ्या केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी उपस्थित जि. प. सदस्य प्रताप पाटील प. स. सभापती मुकुंद नन्नवरे, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटिल सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन गटनेते विनय भावे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, प्रभारी नगराध्यक्ष कल्पना महाजन, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ प्रतिभा संजय चौधरी, नगरसेविका उज्वला परेराव, अंजली विसावे, कीर्ती मराठे, हेमांगी अग्निहोत्री, रेखा भागवत चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, जितू धनगर, सुरेश महाजन, अजय चव्हाण, विलास महाजन, माजी सभापती प्रमोद पाटील, दीपक सोनवणे, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, शहर संघटक धिरेद्र पुरभे, संजय चौधरी, उपतालुक प्रमुख राजेंद्र ठाकरे, बुट्या पाटील, तौसिफ पटेल, भीमराव धनगर, राजू चौधरी, संजय धमोळे, वाल्मिक पाटील पाळधी चे युवासेनचे आबा माळी, भूषण महाजन, करण वाघरे, पापा वाघरे, राहुल रोकडे, हेमंत चौधरी, चेतन जाधव, भगवान महाजन, गजानन महाजन, उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, भरत महाजन, सचिन सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, गोपाल चौधरी, अरविद चौधरी व असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *