आमदार सौ.लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द – राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ…

आमदार सौ.लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द – राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ.

चोपडा : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- विधानसभा मतदार संघ (10)मध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी 2019 मधे निवडणूक लढवली होती.यावेळी सौ सोनवणे आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. निवडणुकी नंतर पराभूत उमेदवार तथा माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या जात प्रमाण पत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयाने या खटल्याचा निकाल दि.4 /11/2020 रोजी लागला असून जात पडताळणी समितीने आमदार सौ लता ताई चंद्रकांत सोनवणे यांचे नाम निर्देशन पत्रा सोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाण पत्र रद्द बात्तल ठरवले आहे.
या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सन-2019 मध्ये चोपडा विधानसभा मतदार संघ-(10) अनुसूचित जमातीच्या राखीव जागे साठी अनुक्रमे 1)सौ लताताई चंद्रकांत सोनवणे(शिवसेना),2)जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी),3)प्रभाकर गोटू सोनवणे,(भाजप बंडखोर),4)सौ माधुरी किशोर पाटील(अपक्ष) 5)डॉ चंद्रकांत जामसिंग बारेला(अपक्ष),या प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली होती.निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे या निवडून आल्या होत्या.दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना मिळाली होती.

या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सन-2019 मध्ये चोपडा विधानसभा मतदार संघ-(10) अनुसूचित जमातीच्या राखीव जागे साठी अनुक्रमे 1)सौ लताताई चंद्रकांत सोनवणे(शिवसेना),2)जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी),3)प्रभाकर गोटू सोनवणे,(भाजप बंडखोर),4)सौ माधुरी किशोर पाटील(अपक्ष) 5)डॉ चंद्रकांत जामसिंग बारेला(अपक्ष),या प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली होती.निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे या निवडून आल्या होत्या.दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना मिळाली होती.

निवडणुकी नंतर पराभूत उमेदवार तथा माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या टोकरे कोळीच्या जात प्रमाण पत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सदर खटल्याची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समिती नंदुरबार येथे त्या खटल्याचा निकाल दि.4 /11/2020 रोजी लागला असून जात पडताळणी समितीने आमदार सौ लता ताई चंद्रकांत सोनवणे यांचे नाम निर्देशन पत्रा सोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाण पत्र रद्द बात्तल ठरवले आहे.तसेच आमदार सौ लताताई सोनवणे यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी जळगाव महानगर पालिका निवडणुकीत अनुसूचित जमाती या राखीव जागेसाठी निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत सौ सोनवणे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र देखील नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे.तसेच अर्जदार यांनी मूळ जमातीचे प्रमाण पत्र जप्त करण्यासाठी आदेश प्राप्त झाल्या पासून आठ दिवसांच्या आत नंदुरबार येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जमा करण्याचे आदेश दि.4 /11/2020 रोजी निर्गमित केले आहेत.समितीने जळगाव महानगर पालिका निवडणुकीत अर्जदार सौ लताताई सोनवणे यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातुन निवडणूक लढवली असल्यामुळे तसेच अनुसूचित जमातीच्या प्रमाण पत्राच्या आधारे देय नसलेला लाभ मिळवलेला असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पळताळणीचे विनियमन ) अधिनियम,२००० च्या कलम-१० व ११ अन्वये उचित कारवाई करण्यात यावी व केलेली कारवाई जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयास अवगत करावी असे देखील आदेशात म्हटले आहे.
चोपडा विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्रा विरुद्ध माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी जात पळताळणी समिती नंदुरबार कार्यालया कडे केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन अखेर समितीने आमदार सौ.सौ.लताताई सोनवणे यांचे टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र सिद्ध न झाल्याने रद्द ठरविण्याचे आदेश दिलेले आहेत. या निकालामुळे त्यांची आमदारकीचे काय ? अशी चर्चा चोपड्यात सुरू झाली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *