ओबीसी आरक्षण बचाव समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिष च्या वतीने भव्य मोर्चा…

नंदुरबार : सबला उत्कर्ष ( सतिष तायडे ) :- ओबीसी आरक्षण बचाव समिती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद याच्या वतीने आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयवर भव्य मोर्चा काढण्यात आला ,यावेळी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच न्यायालयात वकील नियुक्त करावा तसेच ओबीसी कोट्याला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अश्या प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली . या मोर्चात शिम्पी ,चौधरी ,माळी ,सुवर्ण व सर्व ओबीसी समाज सहभागी झाला होता …
आरक्षणात सर्वांना मिळ ओबीसींचे आरक्षण संपवण्याच्या कट काही लोक करीत असून मुंबई दिल्लीच्या न्यायालयात विविध अर्ज करून सर्व ओबीसींना बाहेर काढण्याचा कट केला जात आहे .मराठा समाजाला ओबीसीत टाकून मराठा समाज व ओबीसी यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव समितीतर्फे करण्यात आली जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास आधीच 52 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी अवघ्या 17% वर येऊन जाईल यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होईल त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे तसेच ओबीसी चे खंभिर नेतृत्व छगन भुजबल यानी देखील सत्तेत असून सुद्धा मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.ज्यादिवशी आमच्या आरक्षणाला धक्का लागल्या त्यादिवशी एक,दोन लाख नव्हे तर 50 लाख लोकाचा मोर्चा विधान भवनावर नेऊ असे यावेळी ओबीसी बचाव समितीतर्फे सांगण्यात आले …

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *