जुन्या राजवाड्यातील छत्रपती घराण्याच्या ऐतिहासिक देवघरात घटस्थापना… नवरात्र उत्सवाची सुरुवात.

कोल्हापूर : सबला उत्कर्ष प्रतिनिधि – जुन्या राजवाड्यातील छत्रपती घराण्याच्या ऐतिहासिक आंबा चौकातील देवघरात घटस्थापना केली. आराध्य देवता, कुलस्वामिनी, श्री तुळजाभवानीदेवीची पूजा करून, नवरात्र उत्सवाची सुरुवात केली. यावेळी कुलपंरपरेनुसार शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तख्ताला, तसेच महाराणी ताराबाई राणीसाहेब आणि करवीर छत्रपतींच्या राजगादीला मुजरा केला. छत्रपतींच्या कूळ परंपरेतील दसरा हा अत्यंत महत्वाचा सण आहे. त्या सर्व परंपरा पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असतो. आज सर्व पूजा पूर्ण करून अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बाहेर पडलो आहे. येते चार दिवस पंढरपूर आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रयतेच्या अडी- अडचणी समजून घेऊन सरकार पर्यंत त्यांच्या भावना पोचवणार आहे.छत्रपती संभाजी राजेनीं सागितले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *