सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात 27 तारखेला होणार सुनावणी…

दिल्ली : सबला उत्कर्ष प्रतिनिधी – येणाऱ्या 27 तारखेला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात सुनावणी होणार आहे. आरक्षणाला जी तात्पुरती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तिचा पुनर्विचार करण्यासाठीची याचिका महाराष्ट्र शासन आणि समाजातील जागरूक बांधवांनी दाखल केली त्या संदर्भात सुनावणी होईल. ज्या न्यायमूर्तींनी स्थगिती दिली होती, पुन्हा त्यांच्याच बेंच समोर सुनावणी होणार आहे.

मला आशा आहे, की न्यायदेवता न्याय करेल. मराठा समाज बांधवांचा गेल्या 40 वर्षांचा लढा सार्थकी लागेल,अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच बरोबर, राज्य शासनाकडून मागे ज्या चुका झाल्या किंवा ज्या काही उणिवा राहिल्या त्या पुन्हा होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे.. नव्या जोमाने आणि पूर्ण शक्तीने न्यायालयाच्या समोर समाजाची बाजू मांडावी. संपूर्ण मराठा समाज याकामी आपल्या पाठीमागे उभा राहील.

एकमराठा लाख मराठा.

संभाजीराजे छत्रपती…..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *