पं. स. सभापती शासकीय निवासस्थानी दरवाजा तोडून झाली चोरी…

पं. स. सभापती शासकीय निवासस्थानी दरवाजा तोडून झाली चोरी.

भुसावळ : संजय चौधरी ( सबला उत्कर्ष ) :- शहर पोलिस ठाण्यामागे हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचायत समिती सभापतींच्या शासकीय निवास्थानीच चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी या निवासस्थानाचा दरवाजा तोडून सिलिंडर आणि वीज पंप असा पाच हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी बुधवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सभापती मनीषा पाटील यांनी सांगितले. दि.२८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान शासकीय सुटी असल्याने सभापती त्यांच्या गावी गेल्या होत्या. त्यामुळे निवासस्थानाला कुलूप हाेते. ही संधी साधून चोरट्यांनी दरवाजा तोडून कीचनमधील सिलिंडर तसेच वीज पंप लंपास केला. शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *