जनता त्रस्त कोरोनाचा उद्रेकात,कृषी अधिकारी “मशाल फेरी”आयोजनात!

【जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली?】

【संक्रमणाचा धोका वाढताना समूह कार्यक्रम आयोजन योग्यच नाही?】

नांदेड/गजानन जोशी

संपूर्ण जिल्ह्याभरात कोरोनाचा उद्रेक माजविलेला असताना,उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर यांनी गावाट समूह “मशाल फेरी” आयोजन केले होते….

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत मौजे निप्पानी सावरगाव ता.देगलूर जि.नांदेड
या गावात सूक्ष्म नियोजन प्रक्रिया मशाल फेरी काढण्यात आली..

परंतु या कृषी अधिकारी महोदय यांना कोरोना आजाराचा व जिल्हाधिकारी यांच्या समूह कार्यक्रम न घेणे ह्या आदेशाचा विसर पडलेला दिसतोय,संचारबंदी काळात समूह कार्यक्रम आयोजित करून कसल्याही प्रकारचे कोरोना विषयी सतर्कतेच्या सुविधा नाहीत,सामाजिक अंतराचे सर्व मान्यवर व गावकऱ्यांनाही भान नाही,अश्या कार्यक्रम अयोजनादरम्यान जर कोरोना संक्रमनाचा धोका वाढला तर जवाबदार कोण असेल?

तसेच संबंधित कृषी अधिकारी यांच्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी काय निर्णय घेणार? याकडे तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *