अहेरी उपविभागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून घ्या…

सुशिक्षित बेरोजगार युवकांकडून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांना निवेदन सादर.

आशिष सुनतकर ( सबला उत्कर्ष न्यूज )
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

अहेरी :- उपविभागातील अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. या पाच तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगाराचे कोणते साधन उपलब्ध नाही.
गडचिरोली जिल्हा स्थापना होऊन 38 वर्षे पूर्ण होत असून जिल्ह्यात अज्ञात होते कुठल्या प्रकारची कंपनी किंवा उद्योग उपलब्ध नाही, जिल्ह्यात एकही उद्योग किंवा कारखाना नसल्याने जिल्ह्यातील लोकांना प्रशासनाच्या नोकर भरतीवर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु सन 2014 पासून महाराष्ट्र शासनाने प्रशासनात नोकर भरती घेण्यास मोठ्या प्रमाणात कमी केले असल्याने येथील युवकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
सध्या स्थितीत अहेरी उपविभागात एकही नामांकित शासकीय व्यावसायिक शैक्षणिक संस्था नाही. येथील युवक व्यावसायिक शिक्षण घेण्याकरिता आपल्या जिल्ह्यातून त्यांना बाहेर जावे लागत आहे, उच्च शिक्षण घेऊन आपल्या जिल्ह्यात आल्यावर त्यांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच आर्थिक मागासलेले असल्याने व्यवसाय उभारणीसाठी लागणारी ठराविक रक्कम येथील लोकांकडे उपलब्ध नाही.
उपविभागात बीए. बीएस्सी. बीकॉम. एम ए. एम एस सी . एम कॉम. अभियांत्रिकी, जीएनएम, कृषी पदवीधर, आयटीआय, बी फार्म, व्यावसायिक व व्यावसायिक उच्च शिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगार असल्याचा लागलेला ठपका घेऊन फिरावे लागत आहे.
जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात असल्याने सन 2015 सुरजागड लोह प्रकल्पाद्वारे उद्योग विहिरीत जिल्हा म्हणून गडचिरोली ला लागलेला डाग पुसून काढण्याची क्षमता या प्रकल्पात होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील व उपविभागातील आदिवासी युवकांना या प्रकल्पाद्वारे रोजगाराची संधी देऊन काम करावे अशी आशा येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांमध्ये होती, परंतु या आशेला डावलून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प भाडे तत्वावर शासनाने वेगवेगळ्या कंपनीला देण्यात आली. यातील एका कंपनीने लोह उत्खनन सुरू केले होते व तेथील लोहे ट्रॅक्‍टरच्या साह्याने चंद्रपूर येथील कंपनीत हस्तांतरण केले जात. असे सदर कंपनीने स्थानांतरित रोजगार देण्याकरिता तांत्रिक शिक्षण देण्याची तयारी सुरू केली होती परंतु लोह प्रकल्प सुरजागड येथे उभा राहत नसल्याने तांत्रिकी प्रशिक्षण बंद करण्यात आले.
जिल्ह्यातील खनिज संपत्तीचे उत्खनन करून बाहेरील जिल्ह्यात नेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात खनिज संपत्तीवर येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळणे आवश्यक होते परंतु असे न होता बाहेर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे. यासोबतच उद्योग विहरीत जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची ही ओळख परत काळा दगडावरील रेष म्हणून आधारित करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे.
उपविभागातील या पाचही तालुक्यात नैसर्गिक खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात असून वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे, सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला आहे भविष्यात याचे विपरीत परिणाम या आदिवासीबहुल जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर पडेल उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आर्थिक विषमतेमुळे येथील युवकांना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधात भटकंती करत मध्यप्रदेश तेलंगाना आंध्र प्रदेश छत्तीसगड राज्यात जावे लागत आहे ही मोठी शोकांतिकामानावी लागेल.
आदिवासीबहुल जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना जिल्ह्यात कारखाने उद्योग कुटिरोद्योग व प्रशासनाच्या सेवेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे तसेच जिल्ह्यातील उपविभाग कार्यक्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगार मेळावा कौशल्य विकास कार्यक्रम रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम स्थानक उत्तर विद्यापीठ रोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र याद्वारे रोजगारांची संधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा नाईलाजास्तव येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपल्या हक्कांसाठी आंदोलन आंदोलन करावे लागेल. असे निवेदनात म्हटले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *