धानोरा तालुका काँग्रेस कमेटी तर्फे हाथरस घटनेचां जाहीर निषेध…

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ( सबला उत्कर्ष न्यूज )
धानोरा :- हाथरस घटनेसंबंधी केंद्रातील बीजेपी सरकारआणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारने चालवलेली दडपशाही व दंडुकेशाही अत्यंत खालच्या स्तराची असून लोकशाही करिता ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे .गोरगरीब ,दलिताप्रती संवेदना प्रकट करणाचा भोंग करणाऱ्या केंद्र व उत्तर प्रदेश सरकारचे पितळ या घटनेने उघडे पडलेले आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा घडला असताना कोणतीही चौकशी न करता कुटुंबाला विश्वासात न घेता कुटुंबाला पीडितेचे अंतिम दर्शन सुद्धा घेऊ न देता परस्पर रात्री दोन वाजता पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करून संबंधित घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या गेला असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीने केलेला आहे .पत्रकारांना प्रश्न विचारू देत नाही तसेच कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी सुद्धा देत नाहीत .विरोधी पक्षातील काँग्रेस, सपा, बी एस पी, चे नेते त्या ठिकाणी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्याकरिता गेले असता त्यांच्यावर अमानुषपणे लाठीहल्ला करून धक्काबुक्की करण्याचे निदर्शनास येत आहे. हे कितपत योग्य आहे तसेच ते आपल्या लोकशाहीला काळिमा फासणारे आहे अशा तानाशाही बीजेपी सरकारचा तालुका काँग्रेस कमिटी धानोरा तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे . या घटनेने निषेध निवेदन माननीय तालुका दंडाधिकारी साहेब तहसील कार्यालयामार्फत, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले . यावेळी प्रामुख्याने श्री मनोहर पाटील पोरटे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी धानोरा ,श्री राजूभाऊ जीवानी जिल्हा परिषद सदस्य ,श्री .विनोद लेनगुरे जिल्हा परिषद सदस्य ,अँड.गजानन जी दुर्गा माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली ,श्री .लालाजी परसे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी धानोरा, श्री चंदू पाटील किरंगे माजी पंचायत समिती सदस्य धानोरा ,श्री मुबारक अली सय्यद, श्री. परसरामजी पदा माजी पंचायत समिती सदस्य धानोरा, श्री .कुलदीप भाऊ इंदुरकर उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी धानोरा, श्री सदाशिव येरमे नगरसेवक धानोरा, श्री. समीर कुरेशी नगरसेवक धानोरा, श्री. मिलिंद किरंगे ,श्री जमीर कुरेशी महासचिव धानोरा ,श्री. शारिक शेख, श्री .महेश चीमुरकर, नरेश भैसारे, भूषण भैसारे ,संजय कुळमेथेउपसरपंच सालेभट्टी ,प्रशांत कोराम युवक अध्यक्ष धानोरा ,केशरी पाटील हिचामि माजी सरपंच आणि श्रीरामजी परसे आदी मान्यवर उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *