धुळे-नंदुरबार विधानपरिषदेसाठी आज मतदान पार पडले…

नंदुरबार : सतिष तायडे ( सबला उत्कर्ष ) :- भाजपने कॉंग्रेसमधून आलेल्या अमरीश पटेल यांना संधी दिल्याने भाजपला ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कॉंग्रेसला जर महाविकास आघाडीतील इतर पक्षाची साथ मिळाली तर ही निवडणूक भाजपसाठी कठीण जाण्याची चिन्ह आहेत.
माजी मंत्री अमरिश पटेल यांनी कॉंग्रेसमधून भाजपात येताना राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातून अमरिश पटेल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसचे अभिजीत पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं.

धुळे-नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघातून 437 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेतयासाठी दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 3 डिसेंबरला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

एकनाथ खडसेंची परीक्षा –

एकनाथ खडसेंनी भाजपला सोडुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खान्देशातील पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणूकीत महाआघाडीचे नेते एकनाथ खडसे, धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे आणि इतर नेत्यांचा कस लागणार आहे. एकनाथराव खडसे यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील, असा अंदाज लावला जात आहे. खडसे भाजपला किती डॅमेज करतात? यावरही खडसेंची परीक्षा होणार आहे.

मतांचे समीकरण –

धुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी एकूण 438 मतदार आहेत.

धुळे जिल्ह्यातून 238 मतदार, तर नंदुरबार जिल्ह्यातून 200 मतदार आहे.

पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजपाकडे धुळे जिल्ह्यात 169 मतदार तर नंदुरबार जिल्ह्यातून 70, अशी एकूण 239 मते आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *