पुणे पदवीधर प्रचार दौरा अंतिम टप्प्यात खा. उन्मेश पाटील याचे मतदारांशी गाठी भेटी…

पुणे पदवीधर प्रचार दौरा अंतिम टप्प्यात खा. उन्मेश पाटील याचे मतदारांशी गाठी भेटी.

पुणे : सबला उत्कर्ष ब्युरो :- पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार *संग्राम संपतराव देशमुख* तसेच शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ सातारा जिल्हा दौऱ्यावर असलेले खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सातारा तालुक्यातील गोवेगाव येथे पुणे पदवीधर निवडणुकीनिमित्ताने मतदारांशी संवाद साधत गोवे ग्रामस्थांची भेट घेतली. याप्रसंगी सहकार महर्षी जिजाबा अण्णा जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी भुजंगराव जिजाबा जाधव( संचालक कोटेश्वर शिक्षण प्रसार संस्था गोवे),प्रभाकर साबळे (जिल्हाध्यक्ष सहकार आघाडी सातारा),विठ्ठल बलशेटवार ( जिल्हा सरचिटणीस) ,डॉ.उत्कर्ष रेपाळ (जिल्हाध्यक्ष वैद्यकीय आघाडी),
राहुल शिवनामे (जिल्हा उपाध्यक्ष ) स्वप्नील बोराटे (जिल्हासरचिटणीस युवा मोर्चा सातारा),विक्रांत भोसले (सरचिटणीस सातारा शहर),सोशल मीडिया शहराध्यक्ष कृणाल मोरे,हणमंतराव साबळे व संस्थेचे शिक्षक पदाधिकारी , युवक , ग्रामस्थ उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *