नंदुरबार – शहादा तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या मोटर सायकल चोरांच्या टोळीला पकडण्यात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाले यश…

Satish Tayade
( सबला उत्कर्ष )
Bureau : (Nashik)
मो. 8767648752

नंदुरबार: बाईक चोरणारी टोळी पकडली.

नंदुरबार – शहादा तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या मोटर सायकल चोरांच्या
टोळीला पकडण्यात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. अडीच लाख रुपये किमतीच्या 11 मोटरसायकली देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोटरसायकली चोरीच्या गुन्ह्यांची वाढ झाली होती. गुन्हे दाखल केले जात होते. त्याचा तपास करण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक विजय सिंग राजपूत यांनी एक पथक नियुक्त केले. शहादा आणि मसावद पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पथकाने गावोगाव फिरून शोध घेतला. आठवडी बाजारा सारख्या गर्दीच्या ठिकाणी वेशांतर करून पाळत ठेवण्यात आली. तेव्हा आमोदा गावातील शनि चरणसिंग पाडवी याच्यावर संशय बळावला. त्याची विशेष तपासणी केली असता त्याने चोरलेली एक मोटर सायकल पोलिसांना दिली. मग त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर पवन रंजीत वसावे,रा.आमोदा, हेमंत बागले, गणेश राजपूत, दोन्ही रा.मडकानी आणि योगेश परदेशी राहणार म्हसावद यांची नावे त्याने सांगितली. तसेच या पाचही जणांनी एकत्रितपणे चालवलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली. पथकाने लगेच अन्य संशयितांची धरपकड केली तथापि योगेश परदेशी हा हा पसार होण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या वरील तीनही संशयितांकडून चोरी केलेल्या 11 मोटरसायकली पथकाने जप्त केल्या. शहादा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या दुचाकी चोरीच्या मागील 5 गुन्ह्यांमधील या मोटरसायकली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *