रोझोदा येथे वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्या ! गाव व परिसरात खळबळ…

रोझोदा येथे वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्या ! गाव व परिसरात खळबळ…
सावदा दि. 10 सप्टेंबर :- सबला उत्कर्ष प्रतिनिधी ( भावेश पाटील ) :- सावदा येतून जवळच असलेल्या रोझोदा येथे एका घरात वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून, गाव परिसरात घबराट पसरली आहे.


या संदर्भात सविस्तर माहिती अशी की. रोझोदा येथे सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी, ओंकार पांडुरंग भारंबे वय वर्षे ९०. त्यांची पत्नी सुमन औकार भारंबे वय वर्षे ८५.हे वृध्द दांपत्यं राहात होते.
त्यांच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पासून कंटेनमेन झोन जाहीर करण्यात आले होते. नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर सहकारी येऊन तेथील नागरिकांना तपासणी करीत असत. या अनुषंगाने आज सकाळी डॉ हारून काझी तपासणी साठी आले असता, डॉक्टरांना भारंबे दांपत्याच्या घरातून कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा डॉक्टरांनीच दरवाजा उघडला असता, घरात वृध्द पती – पत्नी दांपत्यं रक्ताचे थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. डॉक्टरांनी लागलीच सावदा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. एपीआय राहुल वाघ यांनी लागलीच सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणले असता श्वानाने शेजारच्या गुरांच्या वाड्यातून फिरून घटनास्थळघराचे गच्चीवरून परत खाली उरल्याचा माग दाखविला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षकांनी भेट दिली.
दुर्दैवी मयत वृध्द दांपत्यांची दोन्ही मुले मुंबई पनवेल येथे नौकरीवर असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली असून, वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्या कोणी व कशासाठी करण्यात आली असावी असे ठोस कारण हाती लागले नाही.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *