धरणगाव शहरात क्रीडाप्रेमींना उपलब्ध करून दिले ट्रॅक मैदान नगराध्यक्ष निलेश चौधरी…

धरणगाव शहरात क्रीडाप्रेमींना उपलब्ध करून दिले ट्रॅक मैदान नगराध्यक्ष निलेश चौधरी

धरणगाव
प्रतिनिधी (भावेश पाटील) :

धरणगाव : धरणगाव येथे विद्यार्थ्यांना शारीरिक वाव मिळावा तसेच मैदानी खेळायचे महत्व आजही कायम असून विद्यार्थ्यांना पोलिस भरती आर्मी भरती यासाठी सर्वप्रथम फिजिकल टेस्ट देणें महत्त्वाचे असते ही बाब धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांना भरती करणारे विद्यार्थी यांनी मैदान मिळवण्यासाठी मागणी केली नगराध्यक्ष नि मा.पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ यांचे मार्गदर्शन घेऊन धरणगाव कॉलेज जवळील ट्रॅक(मैदान) विद्यार्थ्यांना सुसज्ज असे तयार करून दिले त्यांचे शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचा आग्रहाने केला तसेच भविष्यात विद्यार्थ्यांन मधील कलागुणांना वाव मिळवा म्हणून प्रयत्न शील राहील तसेच शारीरिक अडचण तर दूर झाली .

नगराध्यक्ष चौधरी सोबत विद्यार्थी.

मात्र विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी धरणगाव नगरपालिका चे झुमकराम वाचनालय चे सुसज्ज इमारत ची उभारणी करण्यात येत आहे त्यात विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा चे नामकीत लेखकांचे पुस्तक उपलब्ध आहेत विध्यार्थी चा शारीरिक व बौद्धिक वाढ होण्यास मदत होईल याचा मला मनस्वी आनंद आहे तर सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात अधिकारी होऊन धरणगाव चे नाव उज्वल करण्याचा शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *