गोर गरीब विध्यार्थ्यांच्या चेहऱ्या वर हासू फुलविण्याची पत्रकार संघाची भावना उदात्त – गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माध्यमातून विश्वासराव आरोटे हे आदिवासी भागासह सर्व तालुक्यात विध्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचे ईश्वरी कार्य करित आहे.
— श्री. जालिंदर खताळ
गटशिक्षण अधिकारी, अकोले

गोर गरीब विध्यार्थ्यांच्या चेहऱ्या वर हासू फुलविण्याची पत्रकार संघाची भावना उदात्त – गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ

अकोले प्रतिनिधी-

गोर गरीब आदिवासी विध्यार्थ्यांच्या चेहऱ्या वर हासू फुलविण्याची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची भावना उदात्त आहे. पत्रकार केवळ प्रश्न मांडून न थांबता वंचित वर्गाला मदत करत आहेत ही कौतूकास्पद गोष्ट आहे. असे मत अकोले तालुका गटशिक्षण अधिकारी श्री. जालिंदर खताळ यांनी व्यक्त केले.
अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी बोलत होते. यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका सरचिटणीस, पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील हे होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, रानकवी तुकाराम धांडे, कळस बू चे सरपंच राजेंद्र गवांदे, कळस खुर्द चे सरपंच दीपाली चासकर, सचिव संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष गणेश रेवगडे, संजय फुलसुंदर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, सुरेश पथवे, विलास आगविले आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकार संघ राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असतो परंतु त्याचबरोबर समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून अनेक समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवित असतो. विध्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य, कपडे, दप्तर, गुणवंत गौरव सोहळा आयोजित केले जातात.
यावेळी रानकवी तुकाराम धांडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. त्यांची तिसरी च्या पाठ्यपुस्तकात असणारी ‘रानवेडी’ हि कविता स्वतः कवी सांगताना विध्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक सतीश दीक्षित, सुत्रसंचलन अर्जुन भुसारी यांनी तर आभार बाळासाहेब शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी संगीता नवले, संजय भोर, प्रभाकर ठोकळ यांनी प्रयत्न केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *