सत्ताधारी भाजप नगरसेविका सोनल महाजनांचा राजीनामा कारण गुलदस्त्यात, जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी…


प्रतिनिधी भावेश पाटील :-
भुसावळ – सबला उत्कर्ष प्रतिनिधी :-शहरातील प्रभाग क्रमांक २४ च्या भाजप नगरसेविका सोनल रमाकांत महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला अाहे. मात्र, राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात आहे.


नगरसेविका सोनल महाजन यांनी ४ सप्टेंबरला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या समक्ष स्वाक्षरी करुन पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यावर कोणत्याही कारणाचा उल्लेख नाही. या राजीनाम्यावर महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४१ (२) अन्वये जिल्हाधिकारी राऊत यांनी नगरसेविका महाजन यांच्या राजीनाम्याला ४ सप्टेंबर रोजीच मंजुरी दिली. याबाबतचे आदेश सोमवारी ७ रोजी काढले आहेत. भाजपच्या सत्ताधारी गटातील नगरसेविका सोनाली महाजन यांनी राजीनामा का दिला? याचे कारण समोर अालेले नाही. सत्ताधारी गट किंवा कोणावरही रोष किंवा राग नसून वैयक्तीक कारणांमुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *