गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार अजित पवारांकडे…

By sabla utkarsh…

मुंबई : सबला उत्कर्ष –

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआमार्फत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देताच अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे गृहमंत्रीपदाचा कार्यभार राज्याचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

सचिन वाझे प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआमार्फत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देताच अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपदाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.तसेच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येवून देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *