प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विश्वनायक नेतृत्व : विकास, विश्वास आणि आत्मविश्वास देणारे मोदी पर्व…….. लेखक – केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विश्वनायक नेतृत्व :
विकास, विश्वास आणि आत्मविश्वास देणारे मोदी पर्व……..
लेखक – केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले


                                   भारताचे यशस्वी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते, जगात प्रथम क्रमांकाचे नेते ठरले आहेत.यंदा त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा होत आहे.जगभरातून शुभेच्छाचा वर्षाव त्याच्यावर होत आहे.देशवासीयांमध्ये त्यांच्या वाढदिवसाचे उत्साहाने उत्सवरुपी आयोजन केले जात आहे.73 व्या वर्षी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा उत्साह त्यांची ऊर्जा कूशाग्रबुध्दी,कल्पकता,अमोघ वक्तृत्व सिंहासारखे दिमाखदार व्यक्तिमत्व आणि संपूर्ण जग जिकणार त्यांचे नेतृत्व सर्वाना प्रेरणा देणारे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विश्वनायक नेतृत्व ठरले आहे.
                                   उंच आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या पंखांत बळ देण्याचे कौशल्य  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आहे.2014 साला पासून देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने विकासाचे,विश्वासाचे आणि आत्मविश्वासाचे एक नवे मोदी पर्व सुरु झाले आहे.9वर्ष पूर्ण होऊन 10 व्या वर्षात मोदी पर्वाची वाटचाल सुरु आहे.या 9 वर्ष आणि 3 महिन्यांच्या कालावधीत  सबका साथ,सबका विश्वास और सबका प्रयास या त्रीसुत्रीने मोदिनी देशात किमया केली.वर्षोनुवर्ष दुर्लक्षीत ईशान्य भारतातील डोंगर दऱ्यातील माणसाला देशाच्या मुख्य प्रवाहात मोदीनी आणले.मुख्य प्रवाहाच्या उंच गगनात भरारी घेण्याचा विचार ही जे मनात आणण्यास घाबरत होते अशा लोकांना प्रचंड आत्मविश्वासाचे बळ देऊन त्यांच्या पंखात गरुडभरारीची हिमंत देणारे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी हे दुरदृष्टी असणारे द्रष्टे नेते आहेत.मेकिंग इंडिया ते विश्वकर्मा योजने पर्यंत विविध योजनांनी भारतीयांची गुणवत्ता कौशल्य जगाला दाखवून दिली.नुकतिच चंद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली.चंद्रयानच्या यशस्वी मोहिमे मुळे जगात भारताचा मान वाढला आहे.चंद्रयान यशस्वी करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांना पाठिंबा प्रोत्साहन आणि भरीव निधी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.आज भारत देश जगातल्या पहिल्या पाच क्रमांकात आलेला विकसित देश आहे.कोरोनाच्या संकटावर मात करुन भारत देश आर्थिकदृष्टया पाचव्या क्रमांकावर पोहचलेला देश आहे.
                    जी 20 या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष पद भारत देशाला प्राप्त झाले.जी 20 आंतरराष्ट्रीय बैठकांचे देशात चांगले आयोजन झाले. जी 20 च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी भारताचे  प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी अतंत्य उत्कृष्ठरित्या पार पाडली.जी 20 च्या उत्कृष्ठ संयोजन संचालनामुळे जगभरात भारताचा मान वाढला आहे. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विश्वाचे नेतृत्व करण्याची धमक जी 20 च्या अध्यक्ष पदामुळे जगाने अनुभवली मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर जगात 5 व्या क्रमांकावर पोहोचला,त्यामुळे आम्हाला विश्वास आहे मोदींच्या नेतृत्वात भारत जागतिक महासत्ताक निश्चित होईल.
                            यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ज्या गोरगरिबांची बँकेत खाती नव्हती अशांना मोफत बँक खाती खोलुन दिली.ज्याना गरी गॅस नाही अशा ग्रामीन महिलांना उज्वला योजने द्वारे गॅस सिलेडंर मोफत देण्यात आले.आयुष्यमान भारत योजने द्वारे देशातील लाखो लोकांना रु.5 लाख पर्यंतचा विमा देण्यात आला.सेवा,सुशासन आणि गरिब कल्याणाचे उदिष्ट घेऊन मोदी सरकार काम करित आहे.सबका साथ,सबका विश्वास और सबका विकास या प्रगल्भ विचारांनी मोदी सरकार काम करित आहे.पी.एम.गरिब कल्याण अन्न योजनेत 80 करोड लोकांना मोफत धान्य देण्यात आले.11 करोड 88 लाख लोकांना जल जोडणी नळ देण्यात आले.शहरी अणि ग्रामीण भागातील 3 करोड पेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आहे.स्वच्छ भारत योजने अंतर्गत 11 कोटी 72 लाख शौचालयांची निर्मिती करण्यात आली.पी.एम.स्व निधी अंतर्गत 34 लाख 45हजार फेरिवाल्यांना आर्थिक सहायता देण्यात आली.मृद्रा योजनेतुन छोट्या उद्योजकांना 39 करोड 65 लाख कर्ज देण्यात आले. स्टॅडअप इंडिया योजनेत अनुसुचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 7 हजार 351 करोड रुपयांचे कर्ज देण्यात आले.कोविड लॉकडाऊन मध्ये 20 करोड महिलांच्या खात्यांत रक्कम जमा करण्यात आली.37 करोड आयुष्यमान खाते खोलण्यात आले.  9करोड पेक्षा जास्त उज्वला योजनेत एल.पी.जी.कनेक्शन घेण्यात आले.देशातील 11 करोड पेक्षा अधिक शेतकऱयांना पी.एम.किसान योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे.प्रत्येक शेतकऱयाला या योजने अंतर्गत 6 हजार वर्षाला देण्यात आले.अशा अनेक योजना राबवून सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.मोदी सरकारच्या या 9 वर्षाच्या काळात भारताच्या उज्वल भविष्याचा पाया रचण्यात आला आहे.
                             देशातील दलित,गरिब,अल्पसंख्यांक,महिला,ज्येष्ठ नागरीक,दिव्यांगजन सर्व वर्गाला न्याय आणि  विश्वास देणारे सरकार मोदी चालवित आहेत.ओलंपिक सारख्या जागतिक ािढडा स्पर्धामध्ये भारत सुवर्ण पदक जिकणारा देश ठरला आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाला नतमस्तक होऊन संविधान पुजक म्हणून काम करणारे प्रधान मंत्री नरेद्र मोदी आहेत.त्यांनी देशात सर्व प्रथम 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्व श्रेष्ठ अर्थतज्ञ असून त्यांचे विचारच भारताचे भाग्य घडविणारे आहे.असे जाहिर सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा नुसार प्रधान मंत्री नरेद्र मोदी यांची वाटचाल सुरु आहे.त्यामुळे मला विश्वास आहे,जो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार वाटचाल करेल तोच नेता या देशाला महासत्ता घडविल.विश्वनायक नेते ठरलेले प्रधान मंत्री नरेद्र मोदी हेच भारताला जागतिक महासत्ता घडवू शकतील.त्यामुळे 2024 च्या निवडणुकिचे देशात जे अमृत मंथन होईल त्यातून भारत देशाच्याहाती प्रधान मंत्री नरेद्र मोदी च्या नेतृत्वाचा अमृत कलश लाभेल अशी मला खात्री आहे.
केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले भारत सरकार

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *