राज्यस्तरीय फुटबॉल चाचणीसाठी शितल व क्रीशा ची निवड

राज्यस्तरीय फुटबॉल चाचणीसाठी शितल व क्रीशा ची निवड

जळगाव – सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी…

हिमाचल प्रदेश येथे २१ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या महिला राष्ट्रीय खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य चा संघ निवडण्यात येत असून त्याची निवड चाचणी ४ नोव्हेंबर पासून कुपरेज फुटबॉल ग्राउंड, मुंबई येथे होत आहे. या निवड चाचणी साठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट दोन अशा महिला खेळाडूंची निवड जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी प्रशिक्षक अब्दुल मोहसीन व डॉक्टर अस्मिता पाटील यांच्या सहकार्याने केली आहे.एकूण १८ मुलींपैकी या २ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या दोघी भुसावळ येथील रहिवासी असून त्यांची नावे शितल सहानी व क्रीशा बुला अशी आहेत निवड झालेल्या खेळाडूंना जैन इरिगेशनचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख व मुख्य प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांनी एका छोटेखाली समारंभात त्यांना निरोप दिला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *