१९ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या फसवणूक प्रकरणी संशयितास पोलिस कोठडी…

१९ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या फसवणूक प्रकरणी संशयितास पोलिस कोठडी.

जळगाव : सबला उत्कर्ष न्युज प्रतिनिधी ( मयूर वागूळदे ) :- दुग्ध व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून पिंपळगाव हरेश्वर (ता.पाचोरा) येथील शेतकऱ्याला १९ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील अली मोहंमद मुमताज (भांडूप वेस्ट, मुंबई) याला बुधवारी न्यायालयाने २३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर अविनाश हनुमंत वांगडे (रा. लोकमान्यनगर, ठाणे) व रविराज शंकर डांगे (रा. मुलुंड, मुंबई) या दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आाली. या दोघांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, न्यायालयाने तो फेटाळून लावला. या प्रकरणात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांची माहिती पोलिस पथकातर्फे काढली जात आहे.

मुंबईतील तिघांना सायबर पोलिसांनी १५ रोजी अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी तिघांना न्यायालयात हजर केले होते. सरकारतर्फे ॲड. आशा शर्मा यांनी बाजू मांडली. दिल्ली येथील सतिंदरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता हे पोलिस कोठडीचा हक्क राखून आधीपासून कारागृहात आहे. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी उपनिरीक्षक अंगद नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे, अरविंद वानखेडे व श्रीकांत चव्हाण यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *