नुकसानग्रस्तांना काय मदत करणार, ज्यांना शेतीतील काहीच कळत नाही त्यांच्याकडून मदतीची काय अपेक्षा – गणेश भेगडे…

पुणे : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सांगवी, रामपूर येथे शेतक-यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. तसेच बोरी नदीची पाहणी केली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला.*

*“नुकसानग्रस्तांना काय मदत करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे. “फक्त टोलवाटोलवी करायची.. काही आलं की केंद्रावर फेका, इथे फेका तिथे फेका. केंद्रातून मोदीजी मदत करतीलही मग राज्य सरकार काय करते अशा प्रकारची थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.” मुख्यमंत्र्यांना माहित नसेल, मोदीजी तर थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये. आज ते (मुख्यमंत्री) थोडक्याकरता बाहेर पडलेत, दोन तीन तासांचा प्रवास केलाय, मोठी गोष्ट आहे. गावकऱ्यांनी काय रिस्पॉन्स दिला त्यांनी पाहिलेलं आहे”*

*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटी उशिरा का होईना आज घराच्या बाहेर पडले त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना अशी आशा होती की आज मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील व थेट मदत शेतकऱ्यांना जाहीर करतील पण असा कुठलाही प्रकार घडला नाही कर्जमाफी पण शेतकऱ्यांना या आघाडी सरकारने फसवले आता अतिवृष्टीची तरी आर्थिक मदत ते जाहीर करतील अशी आशा होती पण शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आज भोपळा मिळाला असे म्हणावे लागेल, ज्यांना शेतीतील काहीच कळत नाही ते मदत तरी काय करतील शेतकऱ्यांच्या भावना त्यांना कशा कळतील असा सवाल भारतीय जनता पक्षाचे पुणे  जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी उपस्थित केला.*

*आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर, शिरूर, दौंड, बारामती, खेड, आळंदी मावळ, सर्वत्र तालुक्यात मोठे पिकांचे नुकसान झाले आहे, परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे.*

*त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला असून तो आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम बरोबर बैठक घेऊन जी काही मदत देता येईल येईल त्याची तात्काळ घोषणा करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली.*

*शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर ; “नुकसानग्रस्तांना काय मदत करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे. “फक्त टोलवाटोलवी करायची.. काही आलं की केंद्रावर फेका, इथे फेका तिथे फेका.” केंद्रातून मोदीजी मदत करतीलही मग राज्य सरकार काय करते अशा प्रकारची थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.”*

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *