कवयित्री वैशाली जगताप बोरसे यांचा ऑनलाइन काव्य संमेलनात सहभाग.


*सबला उत्कर्ष प्रतिनिधी ( सतिष बोरसे )*


धुळे: येथील मोगलाई परिसरातील विद्या विकास शाळेच्या उपशिक्षिका तथा कवयित्री वैशाली जगताप बोरसे यांचा आज दि.३ आॅक्टोंबर रोजी शनिवारी रात्री आठ वाजता आॅनलाइन काव्य संमेलनात सहभाग असणार आहे.नागपुर येथील रचियता साहित्य मंच आयोजित आॅनलाइन काव्य संमेलनात प्रेम कविता या काव्य प्रकरात त्या ” प्रीत ” ही स्वरचित कविता सादर करणार आहेत.कवयित्री वैशाली जगताप बोरसे यांनी यापूर्वी देखील अनेक काव्यसंमेलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.धुळे येथील जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमीचे मुख्य संचालक अॅड . विनोद बोरसे यांच्या त्या पत्नी असुन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिक अरूण जगताप व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका प्रतिभा जगताप यांच्या त्या कन्या आहेत.कोरोना कहर काळात लाॅकडाऊनमळे महाराष्ट्रातील साधारण पंधराचेवर साहित्य समुहामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी आॅनलाइन सक्रीय सहभाग घेतला व अनेक काव्यप्रकाराचे सादरीकरण करून सुमारे पाऊने दोनशे प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *