गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी आ.धर्मराव बाबा आत्राम सुद्धा पुढे सरसावले!


विषारी दारूमुळे अनेकांचे बळी गेले आहे.
अवैध दारूमुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ( सबला उत्कर्ष )

अहेरी:– चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविण्यात यावी या पाठोपाठ आता गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात यावी यासाठी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम सुद्धा पुढे सरसावले आहेत.
दारूबंदी उठविण्यासाठी शासनाकडे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पाठपुरावा सुरू केले असून विषारी दारूमुळे अनेकांचे बळी गेले आहे व आजही कित्येकजण विषारी दारूचे प्राशन करीत असल्याने जीव धोक्यात घालत आहे. कुटुंबाचा प्रमुख व कमावता विषारी दारूच्या प्राशनामुळे मृत्युमुखी पडल्याचे जिल्ह्यात असंख्य उदाहरणे असून त्यांच्या निधनामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. तसेच चोरट्या मार्गाने दारू सापडत असल्याने अगदी नको त्या वयातही लपून-छपून बालवयातील मुले दारूच्या आहारी गेले असल्याचे निदर्शनास येत आहे. असंख्य पालकांचे व नागरिकांचे यासबंधी वारंवार तक्रारी वाढल्याने आणि दारूबंदी उठवावी अशी मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे करण्यात आल्याने आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी पाऊल उचलले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असले तरी लगतच्या तेलंगणा व छत्तीसगड राज्यात दारूबंदी नसल्यामुळे दारू तस्कर चोरट्या मार्गाने अवैध दारू व नकली विषारी दारू अव्वाच्या-सव्वा भावात विक्री करून पैशाची लूट करीत आहेत. जिल्ह्यातील दारुबंदीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूलही बुडत आहे त्यामुळे तात्काळ गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवावी या मागणीसाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम पुढे सरसावले असून दारूबंदी उठविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *