माझे कुटूंब-माझी जबाबदारी मोहीमेत प्रत्येकांनी सहभाग घ्या आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे आवाहन…

आशिष सुनतकर
सबला उत्कर्ष न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

अहेरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार चे माझे कुटुंब-माझी जबाबदारी हे अभिनव मोहीम राबवित असून या मोहिमेत अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग होण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धी पत्रकानवे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नमूद केले आहे की, दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची लक्षणीय वाढ आणि गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोनामुळे चार रुग्ण दगावल्याने सदर आजाराचे निदान व उपचार करणे काळाची गरज बनली आहे. त्याच अनुषंगाने राज्य शासनाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केले आहे, त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातही या मोहिमेची यशस्वी वाटचाल करण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
मोहिमेचे प्रथम फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर असून दुसरी फेरी 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 आहे. यात प्रत्येक घरी सर्व्हेक्षण पथक जाऊन घरावर माहिती पत्रक लावणे, घरातील प्रत्येक व्यक्तीची नोंद माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोबाईल एप मध्ये करणे, घरातील प्रत्येक व्यक्तीचे थरमल स्कॅनरनी तापमान मोजणे, आरोग्य तपासणी दरम्यान लक्षणे आढळल्यास त्वरित संदर्भ सेवा देणे, प्रत्येक व्यक्तीचे पल्स एक्झिमेटरने Spo2 तपासणी करणे आदी आरोग्य बाबींचा समावेश असून यशस्वीपणे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम अहेरी विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे व या मोहिमेत प्रत्येक कुटुंबांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकातून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *