महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट…

ब्रेकिंगन्यूज. आता सर्वांना एक मोठा दिलासा. महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशन कार्ड धारक समाविष्ट
कोल्हापूर : सबला उत्कर्ष प्रतिनिधी – कोल्हापूरसह जिल्ह्यातील ४४ दवाखान्यांचा समावेश…
□ महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू…
○सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार…
□या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार विकारापासून ते मोठमोठ्या आजार विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्या मधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्या मधून मोफत मिळणार…
○युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे…
□महात्मा फुले जीवनदायी योजनेचा पुन्हा विस्तार केलेला आहे. सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे…
○योजनेअंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन्स कंपनीने ठरवलेले दर आहेत त्यानुसारच आकारणी…
□या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील जे दवाखाने समाविष्ट आहेत, त्यांची यादी सोबत देत आहोत. दरम्यान ; कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही मोठे दवाखाने याआधी या योजनेत समाविष्ट होते. परंतु सरकारच्या तपासणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यानंतर त्यांची सेवा बंद केलेली आहे. या आणि इतर सर्व हॉस्पिटल्सनी या योजनेत नव्याने समाविष्ट व्हावे. तसेच सरकारने जे आजारनिहाय उपचाराचे दर घालून दिलेले आहेत. त्याप्रमाणे आकारणी करावी…
○मुंबई मध्ये या सेवा-कॅन्सर, मेंदू, मणका, किडनी , लिव्हर किंवा असे जे महाभयानक रोग आहेत, त्या रुग्णांना फार मोठा आधार या उपचारांचा…
या विस्तारित महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेऊ घ्या.
○ज्या रुग्णांना ताप,सर्दी,खोकला किंवा कोरोनाची लक्षणे आहेत ते रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातील…
□बाकीच्या सर्व आजारांवर डॉक्टरानी कुणालाही सेवा नाकारू नये. या योजनेअंतर्गत सर्व ते उपचार करावेत…
○महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील हॉस्पिटल्सची नावे अशी…

कोल्हापूर शहर
○ॲपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट
○अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
○कॉन्टॅकेअर आय हॉस्पिटल
○डायमंड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल
○डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट
○जोशी हॉस्पिटल अँड डायलिसिस सेंटर
○कोल्हापूर कॅन्सर सेंटर
○केपीसी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल प्रा. लि.
○कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँड ट्रामा -केआयओटी
○मगदूम इंडो सर्जरी इन्स्टिट्यूट
○मसाई हॉस्पिटल
○राजर्षी छत्रपती शाहू मेडिकल कॉलेज अँड सीपीआर हॉस्पिटल,
○सावित्रीबाई फुले हॉस्पिटल
○सिद्धिविनायक नर्सिंग होम
○सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
○सिद्धिविनायक हार्ट फाउंडेशन
○सनराइज् हॉस्पिटल
○स्वस्तिक हॉस्पिटल
○टूलिप हॉस्पिटल
○वारणा इन्स्टिट्यूट ऑफ युरो सर्जरी
○ओम साई ओंको सर्जरी हॉस्पिटल
○गांधीनगर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय
○सेवा रुग्णालय
इचलकरजी
○अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
○निरामय हॉस्पिटल
○इंदिरा गांधी स्मृती -आयजीएम हॉस्पिटल
जयसिंगपूर
○माने केअर हॉस्पिटल
○हिरेमठ हॉस्पिटल
○संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल
गडहिंग्लज
○कै.केदारी रेडेकर हॉस्पिटल
○देसाई हॉस्पिटल
○गडहिंग्लज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय
○संत गजानन महाराज हॉस्पिटल -महागाव
पेठ वडगांव
○गिरीजा हॉस्पिटल
○कुडाळकर हाॅस्पीटल
कोडोली
○यशवंत धर्मार्थ रूग्णालय
○कोडोली उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय
हेरले
○ह्रदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
घोटवडे
○रामकृष्ण चॅरीटेबल ट्रस्ट दवाखाना
शिरोळ
○शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
आदमापूर
○सद्गुरू बाळुमामा ट्रस्ट हॉस्पिटल
राधानगरी
○राधानगरी ग्रामीण रुग्णालय
पन्हाळा
○संजीवन हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर युनिट
.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *