१५८ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला देणार मान्यता ! पालकमंत्री गुलाबराव पाटील…

भुसावळच्या अमृत योजनेला मिळणार नवसंजीवनी

१५८ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला देणार मान्यता ! पालकमंत्री गुलाबराव पाटील

अमृत योजना…

जळगाव प्रतिनिधी :-सबला उत्कर्ष ( भावेश पाटील) – भुसावळ शहरातील सध्या अडगळीत पडलेल्या तसेच मुदत संपूनही पूर्णत्वाला न आलेल्या अमृत योजनेला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने नवसंजीवनी मिळणार आहे. मूळ ९० कोटींच्या या योजनेच्या १५८ कोटी रूपयांच्या नवीन सुधारित आराखड्याला मंजुरी देणार असल्याची माहिती आज पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिली. यामुळे शहराच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होणार आहे.

अमृत योजना चे वैशिष्ट्य.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरात अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य असून नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा देखील करण्यात येत नाही. या समस्येची गंभीर दखल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. या अनुषंगाने त्यांनी आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीचे आयोजन केले. यात या योजनेच्या कार्यान्वयबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीचे आयोजन केले…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *