*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा* – छत्रपती संभाजीनगर

*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा* *छत्रपती संभाजीनगर

सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी वीणा पाटणी

(औरंगाबाद): – रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची राज्यस्तरीय कार्यकारणी सभा श्री निलेश सोनवणे औरंगाबाद विभागीय अध्यक्ष ( डाॅ.सुरेश सोनवणे व गरुड झेप अकॅडमीचे सर्वेसर्वा) यांचे सौजन्याने संपन्न झाली.* *सदर सभेचे आयोजन औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष श्री निलेश सोनवणे, विभागीय सचिव श्री गणेश पवार तसेच त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले होते.

छत्रपती संभाजी नगर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा राज्य स्तरीय पदाधिकारी बैठकीस धुळे जिल्हा पदाधिकारींची लक्षवेधी उपस्थिती

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या या सभेचे अध्यक्ष माननीय खासदार व प्रांतिकचे प्रदेशाध्यक्ष श्री रामदासजी तडस साहेब यांनी भूषविले. सदर सभेकरिता प्रांतिकचे राज्यस्तरीय पदाधिकारी कार्याध्यक्ष श्री अशोक काका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले, सहसचिव श्री बळवंत मोरघडे, समन्वयक श्री सुनील चौधरी,युवा आघाडीचे कार्याध्यक्ष श्री अतुल वांदिले व राज्य महासचिव श्री नरेंद्र चौधरी,सहसचिव श्री जयेश बागडे,ननि.उपाध्यक्ष श्री प्रकाश देवतळे, सेवा आघाडी कार्याध्यक्ष श्री माधवराव शेजुळ,श्री हरीभाऊ डोळसे, सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला आघाडींचे अध्यक्षा-सचिव, युवाआघाडींचे व सेवा आघाडींचे अध्यक्ष,जिल्हा,तालुकास्तरीय व ५००-६०० पदाधिकारी उपस्थित होते..सदर सभेमध्ये संघटनात्मक कार्यांचा विभाग व जिल्हा निहाय आढावा घेण्यात आला.सदर आढावा संदर्भात अहवाल सादर करतांना सर्वश्री: पोपटराव गवळी, सतीश वैरागी, जगदीश वैद्य, अजय वैरागडे, रावसाहेब राऊत, माधुरी तलमले, वंदना वनकर, सौ.नयनाताई झाडे, विद्याताई करपे, रमेश आकोटकर, अमोल आगाशे, नाना सूर्यवंशी,कैलास चौधरी,निलेश चौधरी,रमेश गवळी,रत्नाकर करनकाळ, रूपाली काळे, छाया करनकाळ, सुनीता बोरसे, अलका मस्के इत्यादी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्याचा आढावा व अहवाल सादर करतांना पुढील वाटचाली संदर्भात वरिष्ठांकडून काही समस्यांसह समाज प्रगती करिता आवश्यक अशा मार्गदर्शनाची अपेक्षा केली.उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर व त्यांनी मांडलेल्या समस्यांचा विचार करता प्रांतिकचे महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.तसेच पुणेविभाग,नागपूर विभागाचे विशेषत: श्रीप्रकाश गिधे,श्री गणेश चव्हाण,श्री जगदिश वैद्य यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा सत्कारही केला.तसेच ज्या विभाग/ जिल्ह्यातून उदासिनता जाणवली त्यांचे कानही टोचले.डाॅ भूषणजी यांनी मागील संदर्भ देऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या भेटीच्या संदर्भ व शासन- प्रशासनाशी केलेल्या पत्र व्यवहारांचा हवाला देऊन प्रांतिकतर्फे सूरू असलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाकरिता आवश्यक असलेल्या मागण्यांचा पाठपुरावा बाबत सभेला कल्पना दिली. सदर सभेमध्ये प्रलंबित असलेल्या तसेच आजमितीस सूरू असलेल्या घडामोडींचा परामर्श घेऊन खालील प्रस्ताव सभेपुढे मांडण्यात आले.सदर प्रस्तावांवर साधकबाधक चर्चा केल्यानंतर निम्न प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले..**प्रस्ताव:*१)हिमाचल प्रदेश, झारखंड व बिहारच्या धर्तीवर तेली समाजाचा एस.सी.जातीमध्ये (मागासवर्गीय जातीमध्ये) समावेश करावा.. २) राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांनी तेली समाजाला “तेली घाणी महामंडळ” स्थापित करून दिले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील “श्री संताजी तेली घाणी महामंडळ” स्थापन करून द्यावे..३)महाराष्ट्रातील सर्व समाजांची जात निहाय जनगणना करावी व त्या त्या जातीसंख्येनुसार त्यांना योग्य प्रमाणात आरक्षण द्यावे तसेच ५०% आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारकडून बिल मंजूर करून वाढविण्यात यावी..४)प्रांतिकने २००३ मधे दिलेल्या १९ मागण्यांपैकी एक असलेली मागणी संत श्रीसंताजी जगनाडे महाराज यांच्या नांवे “श्रीसंताजी आर्थिक विकास महामंडळ”ची स्थापना करून त्याकरिता १००० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा..५) मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही परंतु ओबीसींच्या तुटपुंज्या मिळणार्‍या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र, वेगळे आरक्षण द्यावे..७) मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्या नांवाखाली अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमून संदिग्धता निर्माण करणारा शासन निर्णय मागे घेण्यासाठी मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याकरिता २०२३ला जी समिती नेमण्यात आलेली सदर समिती रद्द करावी व मराठा समाजाला कुणबी मधे समावेश करण्यासाठीचे दाखले देऊ नये व दिल्यास आंदोलन करणे असे ठरले..८)मुंबई येथे तेली समाज भवनासाठी ४ एकर जागा अल्पकिंमतीत उपलब्ध करून द्यावी..९)ओबीसी प्रवर्गाला १९% आरक्षण सध्या मिळत आहे त्यातील ५% तेली प्रवर्गाला वेगळे आरक्षण करून द्यावे..१०)ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू करावीत११)शालेय अभ्यासक्रमात/ पाठ्यपुस्तकात संत श्रीसंताजी जगनाडे महाराज यांचा धडा असावा१२)माननीय पंतप्रधान श्री मोदी साहेब यांनी नुकतीच सुरू केलेली विश्वकर्मा योजना यामध्ये तेली समाजाचा समावेश करावा.. असे महत्वाचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सदर ठराव पुन्हा राज्य सरकार कडे पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. गरज पडल्यास याबाबत निवेदन देणे, आंदोलने करणे, उपोषण करणे व सर्व ओबीसींना एकत्रित आणून ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाबाबत रस्त्यावर उतरण्याची सुद्धा समाजाने तयारी ठेवावी असे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष व खासदार श्री तडस साहेब यांनी देखील वरील प्रस्तावांबाबत तालुकास्तरापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदन देणे, याबाबत समाजाचे व पदाधिकाऱ्यांचे प्रबोधन करणे,जातनिहाय जनगणनेसाठी सर्व तेली जातींनी एकत्र येऊन महासंघाची निर्मिती करावी व तेली समाजाकरिता “घाणी महामंडळ स्थापन” करण्याकरिता शासनावर दडपण आणावे.याकरीता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून सदर महामंडळ आपल्या पदरात पाडून घेणारच अरे आश्वासन श्री तडससा.यांनी दिले.वरील सर्व मागण्या मिळवण्याकरीता आपण सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करावे असे आवाहन केले.या लढ्याकरिता महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करावे असेही त्यांनी आवाहन केले. महाराष्ट्रात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची पतसंस्था स्थापन करावी असेही या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आले..राज्य कार्यकारणीमधे एकूण २७१ सदस्य असून त्यातील अनेक रिक्त पदे अजून भरावयाची आहेत. त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील कार्यकर्त्यांचा आढावा घेऊन त्याची माहिती आपले समन्वयक श्री सुनील चौधरी यांच्याकडे पाठवावी जेणेकरून या २७१ रिक्तपदी जे चांगले कार्य करीत आहेत त्यांना पदोन्नती देऊन सदर रिक्त जागा भरण्याचे ठरवण्यात आले.श्री संताजी महाराजांचे चरित्र कथन, जातनिहाय जनगणना व ओबीसी आरक्षणाबाबत जनजागृती साठीची “रथयात्रा”डिसें.२०२१मधे सुरू केली होती तिचा उर्वरितचे दोन भाग करून एक भाग विदर्भातील उरलेले जिल्हे बुलढाणा,शेगाव,मलकापूर इ. व दुसरा भाग खानदेश, नाशिक, ठाणे व मुंबई असा २ रा टप्पा गणपती विसर्जनानंतर सुरू करावा असे ठरले.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर बाबतचा जिल्हाधिकारी यांनी संस्थानाच्या बाजूने देण्यात आलेल्या आदेशाचा अभिनंदनाचा ठराव श्री सुनिल चौधरी यांनी मांडला व तो एकमताने मंजूर करण्यात आलाश्री संताजीसेना स्थापन करण्याबाबतचा प्रस्तावही सभेपुढे मांडण्यात आला..अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे देवळी येथे देशस्तरावरील अधिवेशन भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले. सदर कार्यक्रम हा महाराष्ट्र प्रांतिक तर्फे संयोजक व आयोजक म्हणून युवाआघाडीचे राज्यसंघटक श्री पंकज तडस यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली व त्यांना याबाबतचे आयोजनाचे अधिकारही देण्यात आले..याच कार्यक्रमात अनेक विभागातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली सदर नियुक्ती पदे देत असताना सर्वांनी एकजुटीने कार्य करावे. कोणत्याही पोट जातीबाबत आकस न धरता,वरीष्ठ पदाधिकार्‍यांचा आदर करुन शिस्तबद्ध व संघटनेचे शिष्टाचार पाळून सर्वांनी एकत्र यावे व तेली समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा असे आवाहन करण्यात आलेसभेचा समारोप करतांना कार्यक्रमाचे आयोजक डाॅ.सुरेश सोनवणे, श्री निलेश सोनवणे साहेब, गरुड झेप अकॅडमी ज्यांनी चहा पान नाश्ता शुभ्र जेवण व राहण्याची तीन तारांकित सोय केली होती याकरिता प्रांतिकच्यावतीने श्री मोरघडेसा यांनी जाहीर आभार मानले.तसेच आयोजकांच्या वतीने श्री निलेश सोनवणे यांनी उपस्थितांचेही आभार मानले..सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आंबेकर सर, सहसचिव श्री बळवंतराव मोरघडे,श्री सुनील चौधरी यांनी केले व त्यांना श्री जयेश बागडे यांनी सहकार्य केले..!

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *