जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात दोन ठिकाणी दारू विक्रेत्यावर धडक कारवाई…


जळगांव : सबला उत्कर्ष ( भावेश पाटील )

वाकडी गाव

पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक गोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पहूर पोस्ट हद्दीत वाकडी गावात देशी व गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमी द्वारा मार्फत बातमी काढून आम्ही स्वतः सपोनि राकेश सिंह परदेशी सोबत रेड पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे पोलीस, शिपाई ईश्वर देशमुख, जितू परदेशी व होमगार्ड जगदीश चौधरी असे मिळून प्रथम वाकडी गावा च्या शिवारात धरणा च्या काठी विनोद सुंदर लाल जोशी याने गैरफायदा करीता गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली असता सदर ठिकाणी रेड करून पाच टाक्या कच्चे रसायन किंमत 11500 जागीच नष्ट केली तसेच वाकडी गावात राहणारा राजू रमेश कोरडे हा त्याचे घराचे बाजूला देशी दारूची चोरटी विक्री करीत असताना सदर ठिकाणी छापा टाकला असता 14 बॉक्समध्ये 29 हजार 952 रुपये किमतीचा देशी दारूचा मुद्देमाल जागीच जप्त करून आरोपी यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत सदर कारवाई ही 5 वा ते 8 वा दरम्यान सायंकाळी करण्यात आले आहे..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *