येवला येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्तीत वाकोद विद्यालयाचे यश

फोटो कॕप्शन- येवला क्रीडा संकुलातील माजी मल्ल यांचे मॕडल व चषक स्विकारताना आनंद सोनेत सोबत क्रिडा शिक्षक अतुल ए.पाटील

जळगाव दि. २० प्रतिनिधी – राणिदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील १४ वर्ष वयोगटातील मुले यात आनंद गोपाल सोनेत हा ४४ वजन गटातुुन प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाला. या यशामुळे आनंद सोनेत ची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. येवला येथील भाऊलाल लोणारी क्रीडा संकुल येथे आज दि. २० रोजी संपन्न झालेल्या नाशिक विभागात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यातून स्पर्धेक आले होते. आनंद सोनेत याने तीन राऊंडमध्ये सहा स्पर्धेकांना चित करत विजय मिळवला. या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह दि. शेंदुर्णी एज्युकेशन को. ऑप सोसायटीत लिमिटेड, शेंदुर्णी संस्थेचे चेअरमन संजय गरूड, सचिव सतिश काशीद, सहसचिव दीपकराव गरूड, ज्येष्ठ संचालिका उज्ज्वला काशीद, वसतिगृह सचिव कैलासराव देशमुख, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विजयी खेळाडूंचे पालक गोपाल सोनेत, तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, क्रिडा शिक्षक के. एम. पाटील, ए. ए. पाटील व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून विजयी खेळाडूंचे कौतुक केले जात आहे
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *